Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण काय? अहमदाबादमधील दुर्घटनेबाबत चौकशी सुरु

What Happened In Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-171 अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेकऑफ दरम्यान कोसळले. विमानात 242 प्रवासी होते.
What Happened In Ahmedabad Plane Crash
Air India Plane CrashDainik Gomantak
Published on
Updated on

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान AI-171 टेकऑफ दरम्यान कोसळले. या अपघातात अनेक लोक जखमी होण्याची शक्यता आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र टेकऑफ दरम्यान अहमदाबादमधील मेघानीनगरजवळ विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. मेघानीनगर विमानतळापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. या घटनेमुळे प्रवासी विमानांच्या सुरक्षिततेबद्दल आणि तांत्रिक त्रुटींबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तथापि, या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विमाने कोणत्या कारणांमुळे कोसळतात याची मुख्य कारणे सांगणार आहोत.

एअर इंडियाची अंतर्गत चौकशी सुरु

दरम्यान, दुर्घटनेनंतर आकाशात काळ्या धुराचे लोट दिसले आणि परिसरात गोंधळ उडाला. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली. अहमदाबाद विमानतळ प्राधिकरण आणि एअर इंडियाने अंतर्गत चौकशी सुरु केली आहे. तांत्रिक पथक विमानाच्या ब्लॅक बॉक्स आणि इतर पुराव्यांचे विश्लेषण करत आहे.

अग्निशमन दल, पोलिस आणि सीआयएसएफने तातडीने बचाव कार्य सुरु केले. पाचहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. लोकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथके घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आणि रुग्णवाहिकाही अपघातस्थळी पोहोचल्या. बचाव कार्य सुरु करण्यात आले असून गुजरात राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने विमान अपघाताची पुष्टी केली आहे.

What Happened In Ahmedabad Plane Crash
Air India Plane Crash: लंडनच्या दिशेने उड्डाण... पण अहमदाबादमध्ये कोसळले एअर इंडियाचे विमान! 242 प्रवासी करत होते प्रवास

विमान अपघात होण्याची मुख्य कारणे कोणती?

तांत्रिक बिघाड

विमान अपघात होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे तांत्रिक बिघाड.

बऱ्याचदा असे दिसून येते की, विमानाचे इंजिनमध्ये बिघाड होतो, नेव्हिगेशन सिस्टिम बिघडते किंवा लँडिंग गियर किंवा पंखांमध्ये समस्या असते, ज्यामुळे विमान अपघात होतो.

मानवी चूक

विमान अपघाताचे कारण नेहमीच तांत्रिक बिघाड असेलच असे नाही.

बऱ्याचदा मानवी चुकांमुळे विमान अपघात होतात.

बऱ्याचदा पायलटच्या चुकीमुळे किंवा हवाई वाहतूक नियंत्रणातील त्रुटीमुळे विमान अपघात होतात.

याशिवाय, बऱ्याचदा विमान उडवणाऱ्या पायलटच्या अनुभवाच्या अभावामुळे, त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे विमान अपघात होतो.

What Happened In Ahmedabad Plane Crash
Nepal Plane Crash: पायलटने चुकीचा लीव्हर ओढला आणि विमान कोसळले; 72 जणांचा मृत्यू- रिपोर्ट

तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुका

अनेकदा विमानात चुकीचे इंधन भरणे, टायर प्रेशरचे निरीक्षण न करणे किंवा तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुकीमुळे विमान अपघाताची शक्यता खूप वाढते.

पायलट आणि नियंत्रण कक्षामधील संपर्क तुटल्यामुळे देखील विमान अपघात होऊ शकतो.

हवामान

विमान अपघात होण्यात हवामान देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

खराब हवामानात जोरदार वादळे, वीज चमकणे, मुसळधार पाऊस यामुळे विमान नियंत्रणाबाहेर जाते, ज्यामुळे अपघात होतात.

2024 मध्ये दक्षिण कोरियामध्ये असाच एक अपघात झाला होता

2024 मध्ये दक्षिण कोरियामध्येही असाच एक अपघात घडला होता, जेव्हा टेकऑफ दरम्यान पक्षी धडकल्याने विमान कोसळले होते. पक्षी धडकल्याने पायलटचे लक्ष विचलित झाले, ज्यामुळे टेकऑफ दरम्यान नियंत्रण सुटले होते. तथापि, अहमदाबाद विमान अपघातात पक्षी धडकल्याची शक्यता असल्याची पुष्टी झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com