
गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी (12 जून) एक मोठा विमान अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान अपघात झाला. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याचे वृत्त आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. वृत्तसंस्था एएनआयनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. या घटनेत किती जीवित आणि वित्तहानी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. हा परिसर सिव्हिल हॉस्पिटलजवळ आहे. विमान अपघातात मोठे नुकसान झाले आहे. राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने अपघाताची पुष्टी केली आहे. अपघातग्रस्त विमानाचा क्रमांक AI171 आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात दुपारी 1.30 वाजता विमान कोसळले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजीपी यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी विमान अपघाताची प्राथमिक माहिती घेतली. अमित शाह यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. एनएसजी टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात होते अशी माहिती समोर येत आहे. त्याचवेळी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सुरतहून अहमदाबादला रवाना झाले आहेत. या अपघाताबाबत एअर इंडियाचे निवेदन समोर आले आहे. एअर इंडियाच्या (Air India) प्रवक्त्यांनी सांगितले की, अहमदाबाद-लंडन गॅटविक या उड्डाण करणाऱ्या AI171 विमानाचा अपघात झाला. सध्या आम्ही या घटनेची माहिती मिळवत असून शक्य तितक्या लवकर http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) अधिक माहिती शेअर करु.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.