Delhi Crime News Dainik Gomantak
देश

Delhi Crime News: मद्यधुंद तरूणांच्या कारने युवतीला 7 किलोमीटर फरफटत नेले...

युवतीचा मृत्यू, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Akshay Nirmale

Delhi Crime News: राजधानी दिल्लीत 31 डिसेंबरच्या रात्रीती एक भयानक घटना समोर आली आहे. मद्यधुंद तरूणांच्या कारने एका दुचाकीस्वार युवतीला धडक दिली. या धडकेत ही युवती कारच्या खाली अडकली. पण याच अवस्थेत या नराधमांनी तरूणीला 7-8 किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातातील मुलीचा मृत्यू झाला असून फरफटल्यामुळे मुलीच्या अंगावर कपडेही राहिलेले नव्हते. मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

एका गाडील मृतदेह लटकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुलतानपुरी येथे विवस्त्र अवस्थेत ही युवती आढळून आली. पोलिसांना तिची स्कुटीही सापडली आहे.

आरोपी तरूण मद्यधुंद अवस्थेत असताना सुलतानपुरीजवळ त्यांच्या घरी परतत होते. यादरम्यान त्यांची मुलीच्या स्कूटीला धडक बसली. यानंतर मुलगी गाडीखाली अडकली आणि आरोपींनी तिला 7-8 किलोमीटरपर्यंत फरपटत नेले.

कांझावाला येथील जोंटी गावाजवळ गाडीखाली मुलीचा मृतदेह अडकलेला पाहून रस्त्याने जाणाऱ्याने पोलिसांना फोन केला. एका खासगी समारंभात वेलकम गर्ल म्हणून ही युवती काम करत होती. ३१ डिसेंबरच्या रात्री काम करून ही मुलगी घरी परतत असताना हा अपघात झाला. सध्या कारचालक अमितसह चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

SCROLL FOR NEXT