Earthquake: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात 'या' 3 ठिकाणी भूकंप

सुदैवाने जीवीत वा वित्तहानी नाही
Earthquake News
Earthquake NewsDainik Gomantak

Earthquake: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात तीन वेळा भूकंप झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र) माहितीनुसार यातील तिसऱ्या भुकंपाचा केंद्र बिंदू जम्मू-काश्मीरमधील कारगिलपासून 250 किलोमीटर अंतरावर होता. या भुकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी होती. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झालेल्या या भुकंपाने लडाखची भुमी हादरली.

Earthquake News
Election 2023: नव्या वर्षात 'या' 10 राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी...

या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. लडाखचा बहुतांश भाग डोंगराळ आहे, त्यामुळे धोक्याची शक्यताही जास्त आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 150 किलोमीटर खोलीवर होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार रविवारी, 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटे आणि 57 सेकंदांनी लडाखमध्ये भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. कारगिलमधील स्थानिक रहिवाशांनाही त्याचे हादरे जाणवले.

दरम्यान, या भुकंपापुर्वी रविवारी देशात आणखी दोन ठिकाणी भूकंप झाला. रविवारी पहाटे 1 वाजून 19 मिनिटांनी हरियाणाच्या झज्जरच्या उत्तर-पश्चिम भागात भूकंप झाला. या भुकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटरवर होता. तर दिल्ली एनसीआर भागातही या भुकंपाचे हादरे बसले. या भुकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी होती. त्यानंतर बंगालच्या उपसागरात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com