‘इथं फक्त प्लॅस्टीक टिकतं’, असा ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमातील एक डॉयलॉग प्रसिद्ध आहे. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. १९९७ साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे प्लॅस्टीक पॅकेट तब्बल २७ वर्षानंतर पाईपलाईनचे काम करताना सापडलं. विशेष म्हणजे हे पॅकेट जसंच्या तसं होतं, त्यावरील माहितीचा मजकूरही तसाच असल्याचे दिसून आले.
समोर आलेल्या व्हिडिओनुसार, एक व्यक्ती पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना दिसत आहे. त्याच्या हातात जलनी जलजीराचे प्लॅस्टीकचे पॅकेट दिसून येत आहे. या पॅकेटवरील जलजीरा विषयी माहिती देणारा मजकूर आहे तसा असल्याचे दिसतंय.
“पाईपलाईन दुरस्तीचे काम करताना खड्डा खोदला असता जलानी जलजीराचे (मसाला) प्लॅस्टीकचे पॅकेट आढळून आले”, अशी माहिती व्हिडिओतील व्यक्ती देत आहे.
“जलजीराच्या पॅकेटवर पॅकिंगची तारीख मार्च १९९७ दिसत असून, त्याची विक्री किंमत १.२५ रुपये एवढी आहे. पॅकेटला पॅकिंगच्या तारखेपासून १२ महिने वापरण्याची मुदत आहे. २७ वर्षापूर्वी एक्सपायर झालेले जलजीराचे पॅकेट आजही तसंच्या तसं आहे, त्यामुळे प्लॅस्टीक वापरू नका”, असा संदेश हा व्यक्ती देताना दिसत आहे.
नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर विविध मतं व्यक्त करत प्लॅस्टीक न वापरण्याचे आवाहन केले आहे. प्लॅस्टीकच्या वापरामुळे पाणी, माती आणि वन्यजीवांना धोका निर्माण होतो, असे मत एकाने व्यक्त केले आहे. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. १९९७ साली १.२५ रुपयांना जलजीरा मसाला कसा मिळू शकतो? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
“सरकार सर्व प्रकारच्या प्लॅस्टीक वापरावर बंदी का घालत नाही? देशात सिंगल युझ प्लॅस्टीकवर यापूर्वीच बंदी घालण्यात आलीय”, असे मत आणखी एका नेटकऱ्यांनी मांडले आहे.
प्लॅस्टीक पृथ्वीसाठी घातक आहे, मायक्रो प्लॅस्टीक मानवी शरीरात जात असून, ते खूप घातक आहे, असे दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करताना प्लॅस्टीक न वापरण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.