Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Curchorem Fish Market: कुडचडे भागात रस्त्याशेजारी उघड्यावर मासळी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मार्केटमधील पारंपरिक विक्रेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
Margao
MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: कुडचडे भागात रस्त्याशेजारी उघड्यावर मासळी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मार्केटमधील पारंपरिक विक्रेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे. अनेकदा कुडचडे पालिका व संबंधित खात्यांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे विक्रेत्यांनी आता थेट पालिकेच्या कार्यालयासमोर बसून मासळी विक्री करण्याचा इशारा दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी सावर्डे-तिस्क येथे रस्त्याशेजारी मासळी विक्री बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनेक विक्रेते कुडचडे येथे रस्त्यालगत बसू लागले आहेत. मार्केटमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असतानाही हे विक्रेते मार्केटमध्ये येण्यास तयार नसल्याचे कृपेश हळर्णकर यांनी सांगितले.

Margao
Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या मारिया फर्नांडिस यांनी सांगितले की, रस्त्यालगत मासळी विक्रीमुळे दुर्गंधीचा त्रास तर होतोच, शिवाय आमच्या व्यवसायावरही गदा येते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२३ मध्ये कठोर कारवाईचे आदेश दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Margao
Tanvi Vasta Case: कुडचडे बँक घोटाळा प्रकरणाला आता 'मनी लाँडरिंग'चाही 'कोन', 'ईडी'कडून तन्‍वी वस्‍तची चौकशी होण्‍याची शक्‍यता

विक्रेत्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर पालिकेने बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई केली नाही, तर मार्केटमधील व्यावसायिक पालिकेसमोर बसून मासळी विक्री करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com