Government Dainik Gomantak
ब्लॉग

Government: सरकारी नोकरीला प्राधान्य का?

Government: निवडणुकीच्या वेळी राजकीय नेत्यांमागे धावून सरकारी नोकरीची अपेक्षा करत बसतात.

दैनिक गोमन्तक

Government: निवडणुकीच्या वेळी राजकीय नेत्यांमागे धावून सरकारी नोकरीची अपेक्षा करत बसतात. राजकारणी लोक आपल्याला हवे तसे युवकांना वापरतात आणि पैसे मौजमजा करण्यासाठी देतात व आपल्याकडे त्यांचा रिमोट कंट्रोल ठेवतात.

पालक आपल्या मुलांना महाविद्यालयात पाठवतात, तेव्हा त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा एकच उद्देश असतो की पदवी मिळाल्यावर चांगली नोकरी करणार. काही विद्यार्थी असतात, की आपण काही तरी वेगळे करावे व आपला स्वतःचा धंदा उद्योग सुरू करावा. पण ही संख्या एकदम कमी असते. ती संख्या वाढावी म्हणून काही महाविद्यालये आणि सरकार आपल्या परीने प्रयत्न करतात.

जेव्हा ही संख्या वाढते तेव्हा सरकारवरचा भार कमी होतो. कारण युवकांना नोकरी देणे ही सरकारची सामाजिक जबाबदारी असते. पण सरकार सगळ्यांना सरकारी नोकरी देऊ शकत नाही. कारण तितक्या संख्येने नोकऱ्या तयार होत नाहीत. पण मुलांना पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरीच पाहिजे असते आणि त्यासाठी वाट्टेल ते करायला युवकांची तयारी असते.

शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षण घेताना पालक सरकारी शाळेपेक्षा खाजगी शिक्षण संस्थेत प्रवेश घेणे पसंत करतात. गावा-गावातसुद्धा पालक मुलांना सरकारी प्राथमिक शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे शाळेची संख्या कमी होत चालली आहे आणि काही बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

काही पालक आपल्या मुलांना शहरात खासगी शाळेत पाठवतात. तसेच उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावरसुद्धा सरकारी महाविद्यालयापेक्षा खाजगी महाविद्यालयात प्रवेश घ्यायला पसंती देतात. कारण लोकांचा सरकारी शाळांवर विश्‍वास नसतो.

गोव्यातील युवक खासगी क्षेत्रातल्या नोकरीपेक्षा सरकारी नोकरीच पसंत करतात. सरकारी नोकरी म्हणजे दर महिन्याच्या एक तारखेला पगार बँकेत जमा होतो. भरपूर आणि पाहिजे तेव्हा सुट्ट्या, निवृत्तीनंतर पेन्शन आणि मुख्य म्हणजे कामाचा ताण नाही. काम सावकाश केलं तरी चालतं. बढती मिळविण्यासाठी जादा कष्ट घ्यावे लागत नाहीत. कारण ज्येष्ठतेनुसार बदली दिली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कायमची नोकरी.

सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही, असे आमचे मुख्यमंत्री परत परत आपल्या भाषणात सांगत असतात आणि ते त्यांचे खरे आहे. गोव्यामध्ये साधारण दरवर्षी १२ ते १५ हजार पदवीधर विद्यापीठातून तयार होतात आणि तितक्या मुलांना सरकारी नोकरीत सामावून घ्यायला सरकारला जमणार नाही.

गोव्यात आणि अन्य राज्यांतसुद्धा अशीच स्थिती आहे. प्रत्येकांना आपला स्वतःचा धंदा सुरू करायला जमणार नाही. त्यामुळे मुलांसमोर एकच पर्याय राहिला म्हणजे खासगी क्षेत्रात नोकरी करण्याचे. खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या या पूर्णपणे गुणवत्तेवर निवडले जातात आणि तिथे वशिला चालत नाही.

खासगी क्षेत्रात त्यांना काम करण्यासाठी माणसं पाहिजे असतात. प्रत्येक कामगार हा कंपनीची मालमत्ता कशी होईल, याकडे ते पाहतात. त्यांना कामगार हा दायित्व बनलेला नको असतो. त्यामुळे घेताना काळजीपूर्वक विचार करून घेतात.

खासगी क्षेत्रात काम करताना घड्याळाकडे बघून काम करता येत नाही. सरकारी ऑफिसला जाण्याची वेळ सांगू शकतात. पण संध्याकाळी घरी किती वाजता पोचेल याची शाश्‍वती नाही. सरकारी खात्यातील काही कर्मचारी वेळेआधीसुद्धा घरी पोचतात. त्यामुळे वेळेचे बंधन सरकारी नोकरीत नसते.

खासगी क्षेत्रात दिलेले काम संपवून घरी जावे लागते. त्यामुळे काम कधी संपेल यावर सर्व अवलंबून असते. सरकारी खात्यात संध्याकाळी काम घेऊन जाल तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोलावले जाते. कारण ते काम करत असताना उशीर झाला तर आपल्याला थांबावं लागणार, या भीतीने उद्या ये म्हणून सांगितले जातात.

खासगी क्षेत्रात काम करताना प्रत्येकाला टार्गेट दिलं जातं आणि ठराविक वेळेत ते पूर्ण करायला पाहिजे. जे काेणी पुरे करू शकत नाही, त्याला अकार्यक्षम मानलं जातं. काही कार्यक्षम अधिकारी जास्त काळ एका कंपनीत राहत नाही. ते सतत नव्या कंपनीच्या शोधात असतात. त्यामुळे आपलं करिअर कसं उज्ज्वल होईल, याचा विचार करीत असतात.

काही खासगी कंपन्यात चांगला पगार, चांगल्या सुखसोयी, परदेशी दौरे अशा अनेक सुविधा मिळतात. ते सरकारी कर्मचाऱ्याला मिळत नाही. फक्त एकच समस्या असते ती म्हणजे खासगी क्षेत्रात कायमची नाेकरी नसते. केव्हा नोकरी जाईल याची शाश्‍वती नाही आणि त्यामुळे गोव्यातील मुले खासगी क्षेत्राच्या नोकरीपेक्षा सरकारी नोकरीला प्राधान्य देतात.

गोव्यात खाण उद्योग जवळजवळ बंद आहे. पर्यटन व्यवसायात फक्त चांगल्या हॉटेल्समध्ये नाेकरी मिळाली तर चांगला पगार व सुविधा मिळू शकते. लहान-लहान हॉटेल्समध्ये नोकऱ्या पुष्कळ असतात. पण पगार कमी आणि काम जास्त. काही युवक नाईलाजाने नोकरी पत्करतात. पण लक्ष सरकारी नोकरीकडे असते.

गोव्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चांगल्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यांना पदवीधर मुलांची गरज असते. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. चांगले उच्चशिक्षित तंत्रज्ञान विषयात ज्ञान मिळवून पुणे, बंगळूर, हैद्राबाद येथे मोठ्या कंपन्यांत मोठ्या पगाराच्या नोकरी करतात. आज चांगलं ज्ञान व आत्मविश्‍वास बाळगून आपलं व्यक्तिमत्त्व चांगलं केलं पाहिजे.

कठोर परिश्रम युवा काळात घेतले तर निश्‍चितच पुढे भविष्य चांगले होऊ शकते, पण सध्या विद्यार्थ्यांमध्ये एक तऱ्हेचा निराशवादी सूर दिसतो. कुठल्याही विषयात जादा ज्ञान मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार नसतात. निवडणुकीच्या वेळी राजकीय नेत्यामागे धावून सरकारी नोकरीची अपेक्षा करत बसतात.

राजकारणी लोक आपल्याला हवे तसे युवकांना वापरतात आणि पैसे मौजमजा करण्यासाठी देतात व आपल्याकडे त्यांचा रिमोट कंट्रोल ठेवतात. फक्त त्यांना एक आश्‍वासन दिलेले असते, की सरकारी नोकरी मिळवून देईन. पण ती कशी मिळविण्यात राजकारणी लोकांना यश मिळते ते त्यांनाच ठाऊक असते. पण गोव्यात युवकांना खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांपेक्षा सरकारी नोकरी करण्यात जास्त सुरक्षित वाटते व त्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतात.

गोवा सरकार मुलांनी खासगी क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यक्तिमत्त्व बनविण्यासाठी खासगी क्षेत्राच्या आधारे प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यास सुरू केले आहे. कदाचित त्यामुळे पुढे अनेकांना खासगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते. सध्या जे पदवीधर महाविद्यालयात निर्माण होतात, ते खासगी क्षेत्रातील उद्योगात नोकरी मिळविण्यास अपात्र ठरतात.

त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना महाविद्यालयात युवक मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार असते. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नांमुळे मुलांना खासगी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी फायदा होईल. फक्त गोव्यातील युवकांनी त्यासाठी आपली तयारी ठेवली पाहिजे. पण जर सरकारी नोकरी पाहिजे म्हणून जर प्रत्येक युवकांनी मनात संकल्प मांडला तर मग कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT