Upcoming Smartphones in June 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

Upcoming Smartphones: घाई करू नका... जूनमध्ये लाँच होणार 'हे' जबरदस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत पाहा

Upcoming Smartphones in June 2026: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी जून २०२६ हा महिना अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा ठरणार आहे.

Sameer Amunekar

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी जून २०२६ हा महिना अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा ठरणार आहे. या महिन्यात भारतीय बाजारपेठेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित ब्रँड्स आपले एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे, यंदा कंपन्या केवळ प्रीमियम सेगमेंटवरच लक्ष केंद्रित करत नसून बजेट, मिड-रेंज आणि गेमिंग सेगमेंटमध्येही अनेक उत्तम पर्याय उपलब्ध करून देणार आहेत. Motorola, Xiaomi, OnePlus, Redmi, iQOO, Vivo, Tecno आणि Infinix सारख्या कंपन्या अवाढव्य बॅटरी, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि अ‍ॅडव्हान्स कॅमेरा फीचर्स असणारे फोन्स सादर करणार आहेत.

४ जूनला होणार 'Motorola Edge 70 Pro+' चा धमाका

मोटोरोला कंपनीने आपल्या आगामी 'Motorola Edge 70 Pro+' च्या लाँचिंगची तारीख जाहीर केली असून हा फोन ४ जून रोजी भारतात एंट्री करेल. हा स्मार्टफोन प्रामुख्याने फोटोग्राफीची आवड असणाऱ्या युजर्सना डोळ्यांसमोर ठेवून डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा दिला जाण्याची शक्यता असून, जो ३.५x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. याशिवाय, दर्जेदार फोटो आणि व्हिडिओसाठी यामध्ये AI झूम आणि प्रगत इमेज स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञान पाहायला मिळू शकते.

लायका कॅमेऱ्यासह 'Xiaomi 17T' ची पुनरागमन

शाओमी आपली लोकप्रिय आणि यशस्वी 'T-सिरीज' पुन्हा एकदा भारतीय ग्राहकांसाठी घेऊन येत आहे. 'Xiaomi 17T' हा फोन देखील ४ जून रोजी लाँच होण्याची दाट शक्यता आहे. या फोनमध्ये ६.५९ इंचाचा AMOLED डिस्प्ले, १४४Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक डायमेंसिटी ८५०० अल्ट्रा प्रोसेसर मिळण्याची अपेक्षा आहे. फोटोग्राफीसाठी यात लायका-ट्यून (Leica-tuned) ५x पेरिस्कोप कॅमेरा आणि दीर्घकाळ बॅकअपसाठी ६५००mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

'OnePlus 15s' मध्ये मिळणार फ्लॅगशिप परफॉर्मन्स

वनप्लस कंपनी या महिन्यात आपला नवा फ्लॅगशिप फोन 'OnePlus 15s' सादर करू शकते. समोर आलेल्या अहवालानुसार, या फोनमध्ये अत्यंत शक्तिशाली असा 'Snapdragon 8 Elite Gen 5' प्रोसेसर पाहायला मिळेल. सुरळीत स्क्रीन अनुभवासाठी १६५Hz चा AMOLED डिस्प्ले आणि ७५००mAh च्या अवाढव्य बॅटरीसह १००W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ५०W वायरलेस चार्जिंगचे फिचर या फोनला प्रीमियम कॅटेगरीत मजबूत दावेदार बनवेल.

'Redmi Turbo 5' आणि 'iQOO Z11 5G' ची थेट स्पर्धा

रेडमी कंपनी आपला बहुप्रतिक्षित 'Redmi Turbo 5' स्मार्टफोन १८ जूनच्या आसपास लाँच करू शकते. यात ७५६०mAh ची बॅटरी, १००W फास्ट चार्जिंग आणि डायमेंसिटी ८५०० अल्ट्रा प्रोसेसर मिळण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे, 'iQOO Z11 5G' ची सध्या बाजारात मोठी चर्चा आहे, कारण यात स्नॅपड्रॅगन ७s जेन ४ चिपसेटसह तब्बल ९०००mAh पेक्षा जास्त क्षमतेची महाकाय बॅटरी दिली जाऊ शकते. जर असे झाले, तर हा फोन बाजारातील सर्वात मोठ्या बॅटरी बॅकअपच्या यादीत अव्वल स्थानी येईल.

गेमर्स आणि बजेट युजर्ससाठी Vivo, Tecno आणि Infinix सज्ज

बजेट सेगमेंटमध्ये वीवो कंपनी आपला 'Vivo T5 Lite 5G' हा फोन २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, गेमिंग प्रेमींसाठी 'Tecno Pova 8 5G' बाजारात येत असून, ज्यात १४४Hz चा डिस्प्ले आणि मोठी बॅटरी असेल. यासोबतच, 'Infinix GT 50 Pro 5G' मध्ये गेमिंगला अधिक मजेशीर बनवण्यासाठी शोल्डर ट्रिगर्स, अ‍ॅडव्हान्स कूलिंग सिस्टीम आणि मीडियाटेक डायमेंसिटी ८४०० अल्टिमेट प्रोसेसरचा सपोर्ट पाहायला मिळणार आहे. एकूणच, जून महिना ग्राहकांसाठी निवडीचे अनेक पर्याय घेऊन येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार घवघवीत वाढ, फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट!

SAFF Championship: यजमान भारताला आता खुणावतेय सहावे विजेेतेपद, फातोर्ड्यात बुधवारी स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भूतानशी गाठ

ST Reservation: एसटींना आरक्षण लागू करा, भाजपकडून मुख्य निवडणूक आयोगाला निवेदन

खरी कुजबुज: पाऊस, प्रदेशाध्यक्ष आणि राजकीय शुद्धीकरण!

Goa Politics: राजकीय पारा वाढला! भाजपचे वरिष्‍ठ नेते दिल्लीत; चर्चांना उधाण; सस्‍पेन्‍स कायम

SCROLL FOR NEXT