Vande Bharat Express Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Train: प्रवाशांचे बल्ले-बल्ले, वंदे भारत ट्रेनबाबत आली मोठी बातमी; लवकरच...

Vande Bharat: देशात वंदे भारत ट्रेनची जोरदार चर्चा आहे. वंदे भारत ट्रेन आल्याने लोकांचा ट्रेनने प्रवास खूप आरामदायी झाला आहे.

Manish Jadhav

Vande Bharat: देशात वंदे भारत ट्रेनची जोरदार चर्चा आहे. वंदे भारत ट्रेन आल्याने लोकांचा ट्रेनने प्रवास खूप आरामदायी झाला आहे. त्याचवेळी, वंदे भारत ट्रेनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हे कळल्यावर लोकांच्या आनंदाला पारावार उरणार नाही.

वास्तविक, टिटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेड (TRSL) आणि सार्वजनिक क्षेत्रातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) यांच्या पाटर्नरशीपला भारतीय रेल्वेकडून 80 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे.

रेल सिस्टम्स लिमिटेड

या कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “टीटागड रेल सिस्टीम्स लिमिटेड आणि भेल कन्सोर्टियम यांनी 2029 पर्यंत 80 वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट तयार करण्यासाठी भारतीय रेल्वेसोबत करार केला आहे.

कराराचे मूल्य सुमारे 24,000 कोटी रुपये आहे.” भारतीय रेल्वेने (Indian Railways) 35 वर्षांसाठी संपूर्ण ट्रेन सेट डिझाइन, निर्मिती आणि देखभाल करण्यासाठी भारतीय समूहाला एवढा मोठा करार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. TRSL-BHEL ही एकमेव स्वावलंबी पाटर्नशीप होती, जी निविदा प्रक्रियेत सहभागी झाली होती.

वंदे भारत ट्रेन

टीआरएसएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी म्हणाले की, “आम्हाला पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर व्हिजनमध्ये काही योगदान द्यायचे आहे. वंदे भारत ट्रेनने आम्ही प्रवास करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे.

सरकारच्या (Government) 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे." ते पुढे म्हणाले की, ऑर्डर सहा वर्षांत पूर्ण होईल. त्याचा पहिला प्रोटोटाइप दोन वर्षांच्या कालावधीत वितरित केला जाईल.

वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणार्‍या आणि व्यवस्थापित केलेल्या प्रतिष्ठित आणि आधुनिक ट्रेनपैकी एक आहे. सेमी-हाय स्पीड ट्रेन मानली जाणारी, ही भारतातील दुसरी सर्वात वेगवान ट्रेन आहे. विशेष म्हणजे, ती पहिली गतीमान एक्सप्रेस आहे. वंदे भारत ही ट्रेन 18 म्हणूनही ओळखली जाते आणि तिचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT