Vande Bharat Train in Kerala: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 एप्रिल) केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पण ट्रेन सुरू होताच वादही सुरू झाला आहे.
पीएम मोदींच्या ग्रीन सिग्नलनंतर ट्रेन शोरनूर जंक्शनवर पोहोचली, तिथे काँग्रेस खासदार व्हीके श्रीकंदन यांचे पोस्टर ट्रेनवर चिकटवण्यात आले होते. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी पोस्टर काढून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
गाडी शोरनूर स्थानकावर आली असता हा प्रकार घडला आहे. रेल्वेच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी श्रीकंदन आणि त्यांचे समर्थक रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.
या घटनेचा निषेध करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी खासदारांच्या समर्थकांचे हे कृत्य असल्याचा आरोप केला. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये आश्चर्य व्यक्त करत खासदार आणि त्यांचे अनुयायी अशा घाणेरड्या मनाने कसे वागू शकतात असे लिहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.