Madhya Pradesh Vande Bharat Express Train: भोपाळ-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भोपाळमध्ये हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानातून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळला पोहोचले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी भोपाळ-दिल्लीदरम्यान धावणाऱ्या वंदे-भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन राणी कमलापती रेल्वे स्टेशन आणि नवी दिल्ली (New Delhi) दरम्यान धावेल. विशेष म्हणजे, ही देशातील 11वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसची रचना देशातच करण्यात आली असून ती उत्कृष्ट प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून आर्थिक विकासाला सातत्याने चालना दिली जात आहे.
IRCTC वेबसाइटनुसार, वंदे भारत एक्स्प्रेसच्या एसी चेअर कारमध्ये दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन ते भोपाळ या प्रवासासाठी खानपानासह 1665 रुपये खर्च येईल, जे ऐच्छिक आहे.
- एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी तिकीटाची किंमत रु. 3120/- असेल ज्यात खानपान शुल्क समाविष्ट असेल.
-भोपाळ-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस एसी चेअर कारचे भाडे केटरिंगसह 1735 रुपये असेल आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 3185 रुपये असेल.
ट्रेन क्रमांक 20171 भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरुन पहाटे 5:40 वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुपारी 1:10 वाजता पोहोचेल. त्याच दिवशी ट्रेन क्रमांक 20172 दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनवरुन दुपारी 2:40 वाजता सुटेल आणि रात्री 10:10 वाजता भोपाळला पोहोचेल. दोन्ही प्रवासादरम्यान ट्रेन आग्रा कॅंट, ग्वाल्हेर आणि वीरांगना लक्ष्मीबाई झाशी स्थानकावर थांबेल. 701 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एकूण 7 तास 30 मिनिटे लागतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.