Tax Free Countries in World Dainik Gomantak
अर्थविश्व

Tax Free Countries in World: फक्त बचत ! 'या' 11 देशांमध्ये एक रुपयाही द्यावा लागत नाही कर

जगात असे 11 देश आहेत, ज्यांना एक रुपयाही कर भरावा लागत नाही

Pramod Yadav

Tax Free Country: भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह सर्व देशांमध्ये लोकांना कर भरावा लागतो. मात्र, याउलट असे अनेक देश आहेत ज्यांना एक रुपयाही कर भरावा लागत नाही.

जगात असे 11 देश आहेत, ज्यांना एक रुपयाही कर भरावा लागत नाही आणि लोकांचे संपूर्ण उत्पन्न त्यांच्या खात्यात जमा होते. त्यामुळे नागरिकांची मोठी बचत देखील होते.

या यादीत सर्वात पहिले नाव बहामासचे येते, जिथे नागरिकांना एक रुपयाही कर भरावा लागत नाही. सरकार केवळ व्हॅट आणि स्टॅम्प या सारखे शुल्क लावते. पर्यटनाच्या दृष्टीने हे एक प्रसिद्ध शहर आहे.

पनामा या मध्य अमेरिकन देशात नागरिकांना कोणताही कर भरावा लागत नाही. येथे समुद्रकिनारे आणि कॅसिनोची मोठी साखळी आहे. येथे भांडवली नफ्यावरही कर भरावा लागत नाही.

UAE हा एक देश आहे जिथे कच्च्या तेलाचा व्यापार होतो आणि त्याची आर्थिक स्थिती त्यावर अवलंबून आहे. येथे नागरिकांना कर भरावा लागत नाही. तसेच, ब्रुनेई देशात खनिज तेलाचा मोठा साठा आहे. हा इस्लामिक देश असून येथील नागरिकांना देखील कर भरावा लागत नाही.

कुवेत आणि ओमानमध्ये तेल आणि वायूच्या साठ्यांमुळे हे दोन्ही देश चांगले पैसे कमावतात, त्यामुळे येथील नागरिकांना कर भरावा लागत नाही. त्याच वेळी, कतारमध्ये तेलाच्या साठ्यामुळे आयकर आकारला जात नाही.

मालदीव आणि मोनॅकोमध्येही कर भरावा लागत नाही. मालदीव हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. सर्वात लहान बेट राष्ट्र नाउरूमध्ये नागरिकांना कोणताही कर भरावा लागत नाही.

आफ्रिकन देश सोमालियामध्येही करप्रणाली नसल्याने परिस्थिती बिकट आहे. या कारणास्तव येथील नागरिकांना कर भरावा लागत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

IFFI 2024: इफ्फीमध्ये 'एंटरटेनमेंट, सबका हक'! तिकीट न घेता Picture Time; सिनेमागृहाची आगळीवेगळी संकल्पना जाणून घ्या

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT