Tata Tiago EV Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Tiago EV: सप्टेंबर महिन्यातच येणार टाटा टियागो इलेक्ट्रिक कार; किती आहे किंमत

गोमन्तक डिजिटल टीम

देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक सेगमेंटच्या अनेक गाड्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. पण, टाटा टियागो इलेक्ट्रिक कारबद्दल (Tata Tiago EV) लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वास्तविक, ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते, असे बोलले जात आहे. सप्टेंबर महिन्यातच ही कार लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. त्याचवेळी Mahindra XUV 400 इलेक्ट्रिक देखील या महिन्यात लॉन्च केले जाऊ शकते.

इलेक्ट्रिक कार मार्केट काबीज करण्यासाठी टाटा मोटर्स वेगाने आपल्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहे. आतापर्यंत टाटाच्या दोन इलेक्ट्रिक कार, टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार आणि टाटा टिगोर इलेक्ट्रिक कार बाजारात आल्या आहेत. दोन्ही गाड्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आता टाटा मोटर्स आपले तिसरे मॉडेल टाटा टियागो इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये लॉन्च करणार आहे.

टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक कार Tata Tiago याच महिन्यात सप्टेंबरमध्ये लॉन्च होऊ शकते. असा दावा केला जात आहे की टाटा टियागो इलेक्ट्रिक कार सप्टेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा टियागो ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल असे बोलले जात आहे.

टाटा टिगोर इलेक्ट्रिकची किंमत 12.5 लाख रुपये आहे. याशिवाय टाटाच्या नेक्सॉन इलेक्ट्रिक कारची किंमत 14.99 लाख रुपये आहे. टाटाची पुढची इलेक्ट्रिक कार टाटा टियागो यापैकी सर्वात स्वस्त असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT