Sonali Phogat हत्येचा मुख्य सुत्रधार अन् हेतू अस्पष्टच; गोवा पोलिस

सोनाली फोगट यांच्या 5 personal dairies गोवा पोलिसांनी घेतल्या ताब्यात
Sonali Phogat
Sonali PhogatDainik Gomantak

पणजी : सोनाली फोगाट यांच्या हत्याप्रकरणावरुन गोव्यातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणाच्या तपासासाठी हरियाणात गेलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या घरातून 5 पर्सनल डायरीज् जप्त केल्या आहेत. फोगाट यांच्या या डायरीज् मधून काय महत्वाची माहिती मिळते का ? याचा तपास सध्या गोवा पोलीस घेत आहेत. फोगाट यांच्या हत्येचा नेमका हेतू आणि मुख्य सूत्रधार कोण याचं उत्तर पोलिसांना मिळालेले नाही.

याबाबत हणजूण पोलिसांनी अशी माहिती दिली की, "गेले एक आठवडा गोवा पोलीस हरियाणात तळ ठोकून होते. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी फोगट यांच्या पर्सनल डायरीज् ताब्यात घेतल्या आहेत. फोगाट यांचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच फोगट यांच्या बँक खात्याची सर्व माहिती मिळवली आहे."

Sonali Phogat
Goa Sand Extraction : हायड्रोग्राफी अभ्‍यासाशिवाय रेतीउत्खनन अयोग्‍य

सोनाली फोगाट यांच्या हत्याप्रकरणाची उच्च पातळीवर चौकशी

या प्रकरणात उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक शोबित सक्सेना यांनी नुकतंच स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, सोनाली फोगाट यांच्या हत्याप्रकरणाची उच्च पातळीवर चौकशी सूरु असून प्रकरणाचा तपास वस्तुनिष्ठपणे केला जात आहे. सोनाली फोगट प्रकरणाच्या तळाशी गोवा पोलीस जातील असे त्यांनी यावेळी नमूद केले.

Sonali Phogat
Goa Dairy: पशुखाद्य प्रकल्पात स्फोट, दोषींवर कारवाई करण्याचा इशारा

गुरुवारी फोगट खून प्रकरणात सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग या दोन आरोपींना दोन दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हरियाणाला गेलेल्या पथकाने केलेल्या तपासात क्रॉस व्हेरिफाय करण्यासाठी आरोपीच्या कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यावेळी अतिरिक्त पोलिस कोठडीचे आदेश दिले.

दरम्यान, सोनाली फोगाट प्रकरण दिवसेंदिवस एक गूढ बनत चालले आहे. याप्रकरणी होणारे विविध आरोपप्रत्यारोप झाले. हत्याप्रकरणात दोषी सापडले असले तरी हेत्येचा मुख्य सुत्रधार अन् हेतू अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यातूनच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे अशी मागणी फोगाट कुटुंबीयांनी केली. आता पोलिसांच्या हाती लागलेल्या फोगाट यांच्या डायरिज् वरून आणखी नवे काय खुलासे समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com