महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात 20 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

वाळू माफिया आणि साखर सम्राटांना मोठा दणका
Income Tax Department
Income Tax Department Dainik Gomantak

आयकर खात्याने (Income Tax Department) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली असून, चार जिल्ह्यात तब्बल 20 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे वाळू माफिया आणि साखर सम्राटांना मोठा दणका बसला आहे. यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी सर्च ऑपरेशन करण्यात आले त्यात आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं. त्यानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Income Tax Department
Goa Sand Extraction : हायड्रोग्राफी अभ्‍यासाशिवाय रेतीउत्खनन अयोग्‍य

आयकर विभागाने आज (09 सप्टेंबर) सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि नाशिक (Solapur, Osmanabad, Kolhapur And Nashik) या जिल्ह्यात आयकर विभागाने सर्च ऑपरेशन केलं. या कारवाईत तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न आणि 100 कोटींपेक्षा जास्त बेनामी व्यवहार उघड झाला आहे. तसेच आयकर विभागाने 5 कोटींचा मुद्देमालही जप्त केला आहे.

उत्पादन, रस्ते, बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय यासह वाळू उत्खनन, साखर उत्पादन यात गुंतवणूक असलेल्या 2 बड्या समूहांना दणका बसला आहे. यावेळी झालेल्या कारवाईत करचोरीच्या अनेक पद्धती उघड झाल्या आहेत. तसेच करोडोंची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Income Tax Department
Panjim : सेवानिवृत्तीची रक्कम व्याजासह द्या!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com