Success story Of Anubhav Dubey Of Chai Sutta Bar. Dainik Gomantak
अर्थविश्व

Chai Sutta Bar: बापाला कळू न देता सुरू केलेला व्यवसाय आज 100 कोटींच्या पुढे गेलाय

Anubhav Dubey : अनुभवने मुलींच्या वसतिगृहासमरच त्यांचे पहिले दुकान सुरू केले होते. मुलींच्या वसतिगृहासमोर दुकान असेल तर तिथे मुली सहज येतील आणि जिथे मुली येतील, तिथे मुलंही येतील, असा अनुभवचा प्लॅन होता.

Ashutosh Masgaunde

Success story Of Anubhav Dubey Of Chai Sutta Bar Who Is Earning In Crores:

भारत एक असा देश आहे, जिथे चहाची बरोबरी दुसरे कोणतेही पेय करू शकत नाही. पाण्यानंतर, चहा हे भारतात सर्वाधिक प्यायले जाणारे पेय आहे. भारतात चहाला मार्केटिंगचीही गरज नाही.

चहाला एवढी मोठी मागणी पाहून अनुभव दुबेने यांनी आपल्या मित्रांसोबत 'चाय सुट्टा बार' सुरू केला आणि काही वर्षांत त्याचे ब्रँडमध्ये रूपांतर केले. आज अनुभव दुबेने त्यातून करोडो रुपये कमावणारे बिझनेस मॉडेल तयार केले.

भारतातील जवळपास प्रत्येक राज्य, शहर, जिल्हा आणि खेडेगावात चहाला मागणी आहे, परंतु उत्तम चवीचा चहा प्यायला स्वच्छ जागा नसल्याची तक्रार प्रत्येकजन करतो. यावर मात करण्यासाठी अनुभव दुबेने त्याचा मित्र आनंद आणि राहुल यांच्यासोबत मध्य प्रदेशातील एका शहरात चहाचे दुकान थाटले.

त्यांनी तरुण ग्राहकांना टार्गेट केले आणि त्यांच्या दुकानात चहाबरोबरच त्यांना पॉझिटीव्ह व्हाइब्स दिल्या. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला भरारी मिळाली. आज चाय सुट्टा बारचा वार्षिक टर्नओव्हर 100 कोटींपेक्षा जास्त आहे.

काय आहे चाय, सुट्टा, बार...

अनुभव दुबे या यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने 2016 मध्ये "चाय सुट्टा बार" हे चहाचे दुकान सुरू केले. अनुभवने त्याच्या CHAI SUTTA BAR मध्ये 10 वेगवेगळ्या फ्लेवरच्या चहा मसाला चहा, वेलची चाह, चॉकलेट चहा, आले चहा, केसर चहा आणि जंबो चहा यांची विक्री सुरू केली.

हळूहळू "चाय सुट्टा बार" इतका प्रसिद्ध झाला की त्यांनी देशभरात फ्रँचायझी देण्यास सुरुवात केली. आज देशात चाय सुट्टा बारच्या 200 हून अधिक शाखा आहेत.

वडिलांचा विरोध झुगारत उभा केला व्यवसाय

अनुभव दुबेचे वडील व्यापारी आहेत. व्यावसायाच्या अनिश्चिततेमुळे वडिलांना आपल्या मुलांनी व्यवसायात न येता शिक्षण घेऊन काही चांगली प्रतिष्ठित नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. यामुळेच अनुभवने यूपीएससीची तयारी सुरू केली होती.

2016 मध्ये UPSC ची तयारी करताना 22 वर्षांच्या अनुभवाला एके दिवशी अचानक चहाचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली.

अनुभवाला वाटले की, आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लोक चहा-कॉफी पितात. यानंतर, मार्केटचा अभ्यास करुन, अनुभवने इंदूरमध्ये चहाचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचे नाव "CHAI SUTTA BAR" असे ठेवले. विशेष म्हणजे, अनुभवने त्याच्या वडिलांना भीतीमुळे याबद्दल कित्येक दिवस सांगितलेच नव्हते.

मित्राची साथ

चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुभवने त्याचा मित्र आनंद नायक याची मदत घेतली. सुरुवातीला काही पैसे जमवल्यानंतर ते दुकानाच्या डेकोरेशनसाठी गुंतवले आणि "CHAI SUTTA BAR" नावाचे चहाचे दुकान सुरू केले.

अनुभवने त्याच्या दुकानात मसाला चहा, वेलची चहा, चॉकलेट चहा, आले चहा, गुलाब, पान, केशर, आणि जंबो चहा असे 10 प्रकारचे चहाचे फ्लेवर ठेवण्यास सुरुवात केली. याशिवाय "CHAI SUTTA BAR" मध्ये कॉफी आणि स्नॅक्स विकायलाही सुरुवात केली.

गर्ल्स हॉस्टेल अन् चाय सुट्टा बार

अनुभवने “CHAI SUTTA BAR” ची लोकप्रियता वाढवण्यासाठी एक खास ट्रीक वापरली होती. अनुभवने मुलींच्या वसतिगृहासमोरच त्यांचे पहिले दुकान सुरू केले होते. मुलींच्या वसतिगृहासमोर दुकान असेल तर तिथे मुली सहज येतील आणि जिथे मुली येतील, तिथे मुलंही येतील, असा अनुभवचा प्लॅन होता.

याशिवाय, अनुभवच्या मित्रांनीही त्याला “चाय सुट्टा बार” ची लोकप्रियता वाढवण्यात मदत केली. अनुभवचे 5-10 मित्र गर्दीच्या ठिकाणी जमायचे आणि “चाय सुट्टा बार” ची मोठ्याने स्तुती करायचे. त्यामुळे ‘चाय सुट्टा बार’ हे नाव लोकांपर्यंत पोहोचू लागले.

वंचितांना रोजगाराची संधी

अनुभवच्या "CHAI SUTTA BAR" च्या अनेक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे वंचित लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत, अनुभवने अनाथ असलेल्या त्यांच्या पहिल्या कर्मचार्‍याची गोष्ट सांगितली. त्याने या लहान मुलाला रोजगार देऊन त्याचे आयुष्य कसे पालटले हे सांगितले.

अनुभव अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात संधी देतो आणि म्हणतो की, चाय सुट्टा बार विशेषतः अनाथ, अपंग लोक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या लोकांना रोजगार देते. आज 300 पेक्षा जास्त वंचित कुटुंबांना चाय सुट्टा बारमध्ये काम करण्यासाठी संधी मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT