Success Story: कर्जबाजारी तरुण सहा वर्षात 55 हजार कोटींचा मालक, यशोगाथा पहिल्या क्रिप्टो अब्जाधीशाची

Jaynti Kanani: करोडोंच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या जयंती यांच्यासाठी, नियतीने कल्पनेपेक्षा चांगली योजना आखली होती.
Jaynti Kanani |Polygon|Crypto Billionaire
Jaynti Kanani |Polygon|Crypto Billionaire Dainik Gomantak
Published on
Updated on

Jaynti Kanani From Gujarat Build 5000 cr Company Polygon to Become First Crypto Billionaire Of India:

जो चल रहा है उसके पाँव में ज़रूर छाला होगा,
बिना संघर्ष के चमक नहीं मिलती,
जो जल रहा है तिल-तिल, उसी दीए में उजाला होगा !

असे म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने कठोर परिश्रम केले आणि हार मानली नाही तर त्याला नक्कीच यश मिळते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जयंती कनानी. जयंती कनानी हे क्रिप्टो प्लॅटफॉर्म पॉलिगॉनचे सह-संस्थापक आहेत.

मजुराचा मुलगा झाला क्रिप्टो अब्जाधीश

गरिबीचा सामना करणे, 6,000 रुपये मासिक पगारावर नोकरी करणे आणि नंतर क्रिप्टो फर्मची स्थापना ते शार्क टँकचे जज मार्क क्यूबन यांना गुंतवणूकदार म्हणून मिळवणे, अशा अनेक आश्चर्यकारण पराक्रम या व्यक्तीने केले आहेत.

एका सामान्य मजुराचा मुलगा असलेल्या जयंती कनानी यांनी भारतातील पहिले क्रिप्टो अब्जाधीश होण्याचा मान तर मिळवलाच आहे, पण ते भारतातील असंख्य तरणांचे प्रेरणास्थान बनले आहेत.

शाळेची फी भरायला नसायचे पैसे

गुजरातमधील अहमदाबादच्या सीमेवर एका छोट्याशा गावात राहणाऱ्या जयंतीचे वडील हिऱ्याच्या कारखान्यात मजूर होते. घरची आर्थिक परिस्थिती अशी होती की अनेकवेळा जयंतीला शाळेची फी भरण्यासाठीही संघर्ष करावा लागला.

शालेय जीवनात त्यांच्या कुटुंबाकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. पण सुदैवाने तो 10वी आणि 12वी उत्तीर्ण झाला आणि नंतर जवळच्या नडियाद येथील धरमसिंग देसाई युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाला आणि तिथे इंजिनीअरिंग केले.

6 हजार पगाराची नोकरी

मनी कंट्रोलला दिलेल्या एका मुलाखतीत जयंती म्हणाले होते, “चांगली नोकरी मिळवणे आणि माझ्या वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे हे माझे ध्येय होते. त्यामुळेच मी पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टम्समध्ये रुजू झालो. त्यावेळी माझा पहिला माझा पगार होता, 6,000 रुपये प्रति महिना.

माझ्या वडिलांनाही डोळ्याच्या समस्येमुळे हिऱ्यांचा आकार दिसत नव्हता, त्यामुळे त्यांचे काम गेले होते. त्यामुळे मला माझी पुढील नोकरी शोधावी लागली आणि सुदैवाने मला ती मिळाली."

ते पुढे म्हणाले, "मी अनेक साइड प्रोजेक्ट्सवर काम करायचो. मी सुमित मणियारच्या स्टार्टअपमध्ये सहभागी झालो, ज्यांनी नंतर RuPay सुरू केली. मग मी Housing.com मध्ये सहभागी झालो आणि मग Matic सुरू केले. काही काळातच, मी कर्जात बुडालो होतो. त्यामुळे मी एक अब्ज डॉलर्सची कंपनी सुरू करेन असं कधीच वाटलं नव्हतं."

दिग्गज गुंतवणुकदाराची साथ

करोडोंच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या जयंती यांच्यासाठी, नियतीने कल्पनेपेक्षा चांगली योजना आखली होती.

शार्क टँक जज आणि अमेरिकन अब्जाधीश मार्क क्यूबन हे जयंती यांच्या कंपनीत गुंतवणूकदार होण्यापूर्वी मॅटिकचा वापर करायचे. ते पॉली अॅप्लिकेशनचा वारंवार वापर करत असे. त्यामुळे त्यांनी जयंतीच्या कंपनीत गुंतवणूक केली आणि पॉलीगॉनला बूस्ट मिळाली.

Jaynti Kanani |Polygon|Crypto Billionaire
Success Story: हसण्या खेळण्याच्या वयात उभारली 100 कोटींची कंपनी; मुंबईच्या तिलकची महिन्याला करोडोंची कमाई

पॉलिगॉनची स्थापना

क्रिप्टो फर्म पॉलिगॉनची स्थापना 2017 मध्ये झाली. त्याच्या सध्याच्या नावाने ब्रॅंडिंग करण्यापूर्वी त्याला मॅटिक म्हटले जात असे. त्याची स्थापना मुंबईतील चार सॉफ्टवेअर अभियंत्यांनी केली होती.

ज्यामध्ये जयंती कनानी, संदीप नेलवाल, अनुराग अर्जुन आणि मिहाइलो बीजेलिक यांचा समावेश होता.

ही डिजिटल करन्सी इथरियमला ​​अधिक सुलभ बनवते आणि विकेंद्रित वित्त (DeFi) आणि इतर विकेंद्रित अॅप्स (DApps) जसे की नॉन-फंगीबल टोकन (NFTs) आणि विकेंद्रित स्वायत्त संस्था (DAOs) विकसित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

मार्केट कॅपिटलायझेशनद्वारे जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथरियमवरील उच्च शुल्क आणि व्यवहारांच्या वेगाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हे तयार केले गेले.

Jaynti Kanani |Polygon|Crypto Billionaire
Success Story: इन्फोसिसमध्ये 9 हजारात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा पट्ट्या, आज आहे दोन कंपन्यांचा मालक

जयंती आज 55 हजार कोटींच्या कंपनीचे मालक

2021 मध्ये अब्जाधीश मार्क क्युबनकडून 'मोठी गुंतवणूक' उभी केल्यावर कंपनीची जगभरात चर्चा झाली होती. बिझनेस टुडेच्या म्हणण्यानुसार, एका वर्षानंतर, कंपनीने यूट्यूबचे गेमिंग प्रमुख रायन व्याट यांना पॉलिगॉन स्टुडिओचे प्रमुख म्हणून आणले.

त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये, कंपनीने Sequoia Capital India, SoftBank Vision Fund 2, Galaxy Digital, Galaxy Interactive, Tiger Global, Republic Capital आणि इतरांसह 40 हून अधिक उद्यम भांडवल कंपन्यांकडून $450 दशलक्ष जमा केले.

अवघ्या 6 वर्षांत, या कंपनीने बरेच यश मिळवले आहे. कंपनीचे सध्याचे मूल्य 55 हजार कोटी रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com