Steps To Change And Update Birth Date On Aadhar Card. Dainik Gomantak
अर्थविश्व

अवघ्या काही मिनिटांत बदलता येते Aadhar Card वरील जन्म तारीख, फॉलो करा या स्टेप्स

Aadhaar Card Update: तुमच्या आधार कार्डमध्ये काही चुका आहेत का? जर असतील, तर तुम्ही काही मिनिटांत त्या दुरुस्त करू शकता, तुम्हाला फक्त सोप्या टीप्स फॉलो कराव्या लागतील.

Ashutosh Masgaunde

Steps To Change And Update Birth Date On Aadhar Card: भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे आधार कार्ड, जे स्मार्ट कार्ड म्हणूनही ओळखले जाते.

बँक खाते उघडणे असो किंवा नवीन सिमकार्ड घेणे असो किंवा शाळा-कॉलेजात प्रवेश घेणे असो, आधार कार्ड हा एक आवश्यक कागदपत्र बनला आहे.

आधार कार्डमधील माहितीतील एखादी चूक तुमच्यासाठी समस्या निर्माण ठरू शकते. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही चुकीची माहिती असेल किंवा नावात काही चूक असेल किंवा इतर तपशील चुकीचे असतील तर तुम्ही ती ताबडतोब दुरुस्त करण्याची गरज आहे.

आधार कार्डशी संबंधित काम किंवा दुरुस्ती असेल तर त्यासाठी देशभरात आधार केंद्रांची व्यवस्था केली आहे. परंतु जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा देखील अवलंब करू शकता.

तुम्ही घरातून किंवा जगातून कुठूनही राहून आधार कार्डमध्ये झालेली चूक सुधारू शकता. यामध्ये तुमची जन्मतारीख चुकली असेल, तर ती तात्काळ दुरुस्त करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करू शकता.

आधार कार्डवरील जन्मतारीख अपडेट करण्यासाठी स्टेप्स

  • uidai myaadhaar.uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • येथे साइन अप करा किंवा लॉग इन करा.

  • यासाठी तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

  • त्यानंतर Send OTP चा पर्याय निवडा.

  • तुमचा आधार लिंक फोन नंबरवर OTP येईल, तो टाका आणि लॉगिन करा.

  • त्यानंतर Update Aadhaar वर क्लिक करा.

  • यानंतर जन्मतारखेचा पर्याय निवडा.

  • येथून तुम्ही तुमची जन्मतारीख बदलू शकता.

  • त्यासाठी मागितलेली कागदपत्रे अपलोड करा.

  • सर्व मूळ कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.

  • यासाठी तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल.

  • रक्कम जमा केल्यानंतर जन्मतारीख बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

UIDAI चा सल्ला

कोणत्याही इंटरनेट कॅफे किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक संगणकावरून आधार डाउनलोड किंवा अपडेट करू नका.

जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणाहून आधार डाउनलोड केले असेल तर तेथे तुम्ही UIDAI च्या संकेतस्थळावरुन लॉग आऊट केल्याची खात्री करा.

तसेच तुमची ब्राउझिंग हिस्ट्रीही डिलिट करा. तसेच तुम्ही ओळखत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला आधार कार्डशी संबंधित माहिती देऊ नका.

आधार फ्रॉड झाल्यास काय करावे?

जर तुम्हीही आधारशी संबंधित फसवणुकीला बळी पडला असाल तर प्रथम UIDAI ला त्याची माहिती द्या. यानंतर पोलिसांकडे तक्रार करा.

याच्या मदतीने तुम्ही भविष्यात होणारी फसवणूक, आर्थिक नुकसान आणि फसवणुकीचा धोका टाळू शकाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT