Successful Start-Ups: घरोघरी भाजी विकणाऱ्या तरुणाने उभारले करोडोंचे स्टार्टअप, आज कमावतोय महिन्याला लाखो रुपये

Successful Start-Ups: आर्या गो कॅब सर्व्हिसचे मालक दिलखुश कुमार यांनी, आर्थिक अडचणींवर मात करून आपली कंपनी उभी केली. ते आज त्यांच्या कंपनीत लोकांना रोजगारही देत ​​आहेत.
Dilkhush Kumar Of Bihar Started Business Of Rodbez With One Car, Now Earning In Crores.
Dilkhush Kumar Of Bihar Started Business Of Rodbez With One Car, Now Earning In Crores.Dainik Gomantak

Success Story Of Dilkhush Kumar Of Bihar Started Business Of Rodbez With One Car, Now Earning In Crores: बिहारमध्ये प्रतिभेची कमतरता नाही, येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात राज्याचे नाव कमावत आहेत. त्याचबरोबर बिहारमधील काही तरुणांच्या यशोगाथाही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

आता आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने सुरुवातीच्या काळात खूप अडचणींचा सामना केला, परंतु त्याच्या मेहनतीमुळे तो आज करोडोंच्या कंपनीचा मालक झाला आहे. आणि त्याची समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

होय, आम्ही बोलत आहोत आर्य (रॉडबेझची) गो कॅब सर्व्हिसचे मालक दिलखुश कुमार (Dilkhush Kumar) यांच्याबद्दल, ज्यांनी आर्थिक अडचणींवर मात करून आपली कंपनी उभी केली. ते आज आपल्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना रोजगारही देत ​​आहेत.

12 वी पर्यंत शिक्षण

दिलखुश हे बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांनी फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. कधी त्यांनी रिक्षा चालवली आहे तर कधी घरोघरी जाऊन भाजीही विकली आहे.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची त्यांची पहिल्यापासून ईच्छा होती. तसेच बिहारमध्ये एक सुसज्ज टॅक्सी सेवा असावी असे त्यांना कायम वाटायचे.

इथेच दिलखुश (Dilkhush Kumar) यांच्या या व्यवसायाचा पाया रचला गेला. हा स्टार्टअप उबेर किंवा ओलासारख्या इतर टॅक्सी कंपन्यांसारखा नाही. ही एक डेटाबेस कंपनी आहे जी ग्राहकांना टॅक्सी चालकांशी जोडते. 50 किमी पेक्षा जास्त लांब अंतराच्या प्रवासासाठी वाहने पुरवते.

लहानपणापासून आर्थिक चणचण

दिलखुश कुमार यांचे सुरुवातीचे आयुष्य गरिबीत गेले. आर्थिक संकट इतके गंभीर होते की, अशा वेळी एखादी व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य त्या परिस्थितीशी झगडत घालवते. पण दिलखुश कुमार यांनी हिंमत न हारता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

दिलखुश कुमार (Dilkhush Kumar) यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. ते दहावी आणि बारवी अक्षरशः थर्ड क्लास श्रेणीतून पास झाले. आर्थिक चणचण भासणारी परिस्थिती अशी होती की, ते संपूर्ण आठवडा त्यांच्या अंगावर एकच कपडे असायचे.

जुन्या कारने कंपनीची सुरुवात

दिलखुश कुमार यांनी जुन्या टाटा नॅनोने रॉडबेझची सुरुवात केली. कंपनी सुरू केल्यानंतर सहा ते सात महिन्यांत दिलखुश आणि त्यांच्या टीमने चार कोटी रुपये उभे केले.

सुरुवातीला कंपनी पाटणा ते बिहारच्या प्रत्येक गावात सेवा पुरवत असे. दुसऱ्या टप्प्यात आणखी शहरे जोडण्यात आली.

बिहारमधील प्रत्येक शहरात कंपनीचे अस्तित्व प्रस्थापित करणे हा त्यांचा उद्देश आहे. भविष्यात, दिलखुश कुमार (Dilkhush Kumar) यांचा बिहारबाहेर आपल्या सेवांचा विस्तार करण्याचा मानस आहे.

ड्रायव्हर्सना देण्यात येणारे पगार ही रॉडबेझची सर्वात आकर्षक बाब आहे. दिलखुश यांना चालकांची परिस्थिती माहीत आहे. कंपनी चालकांना 55,000 ते 60,000 रुपये मासिक वेतन देते.

Dilkhush Kumar Of Bihar Started Business Of Rodbez With One Car, Now Earning In Crores.
बाप टोमणे मारायचा, पण ल्योक जिद्दी होता; गोष्ट 2 हजार कोटींच्या बिझनेसची

शिपाय म्हणूनही कोणी नोकरी दिली नाही

दिलखुश कुमार यांचे वडील ड्रायव्हर होते, ते फक्त आपल्या मुलाला दोन वेळचे जेवण पुरेल एवढी कमाई करू शकत होते. त्याचवेळी दिलखुश कुमार यांंचे लहान वयात लग्न झाल्यामुळे कुटुंबाचा भार आणखी वाढला होता.

आर्थिक परिस्थिती पाहून दिलखुश (Dilkhush Kumar) यांनी अभ्यास सोडून नोकरी शोधायला सुरुवात केली. नोकरीच्या शोधात त्यांनी शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. पण तिथेही त्यांना अशिक्षित असल्याचे सांगत नाकारण्यात आले.

Dilkhush Kumar Of Bihar Started Business Of Rodbez With One Car, Now Earning In Crores.
सेक्युरिटी गार्डचा 12 वी नापास मुलगा, आज आहे कोट्यावधींच्या कंपन्यांचा मालक

आयफोनचा लोगो ओळखता आला नाही

दिलखुश कुमार एकदा नोकरीच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्याचा पेहराव पाहून मुलाखतकाराने त्याला नकार देण्याचे ठरवले होते. त्याला पाहून मुलाखत घेणाऱ्याच्या मनात तो काम करू शकेल का, तो चांगला उमेदवार आहे का, असे विविध प्रश्न येऊ लागले.

मुलाखत घेणाऱ्याने त्याला चेक करण्यासाठी आयफोन दाखवला आणि कंपनीचे नाव विचारले. दिलखुश कुमारने (Dilkhush Kumar) पहिल्यांदा आयफोन पाहिला तेव्हा त्याला उत्तर देता आले नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com