State Bank's important decision on ATM usage will hit to the consumers Dainik Gomantak
अर्थविश्व

एटीएम वापराबाबत स्टेट बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

'एसबीआय'चे देशभरात एकूण १२ कोटींहून अधिक बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेदार आहेत. २०१५-२०२० या वर्षात बँकेने सेवा शुल्कातून ३०० कोटींची अतिरिक्त कमाई केली होती. या दरवाढीनंतर बँकेच्या महसुलात देखील वाढ होण्याचची अपेक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने(SBI) आता एटीएम (ATM) व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांचे बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खाते (BSBD Accounts) आहे अशा ग्राहकांना महिनाभरात चार एटीएम व्यवहार नि:शुल्क असतील मात्र त्यावर झालेल्या प्रत्येक व्यवहावर बँकेकडून १५ रुपये शुल्क वसुली केली जाणार असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर आता या खातेदारांना चेकसाठी देखीलअधिक पैसे मोजावे लागतील. गुरुवार १ जुलै २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे बँकेच्या १२ कोटीहून अधिक खातेदारांना झळ बसणार आहे.'एसबीआय'चे देशभरात एकूण १२ कोटींहून अधिक बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेदार आहेत. २०१५-२०२० या वर्षात बँकेने सेवा शुल्कातून ३०० कोटींची अतिरिक्त कमाई केली होती. या दरवाढीनंतर बँकेच्या महसुलात देखील वाढ होण्याचची अपेक्षा आहे.

एकीकडे बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेदारांना दर महिन्याला चार एटीएम व्यवहार नि:शुल्क असतील. त्यानंतर एटीएम व्यवहार झाल्यास त्यावर १५ रुपये अधिक जीएसटी असा सेवा शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

तर दुसरीकडे चेकचा देखील जपून वापर करावा लागणार आहे. खातेधारांना एका वर्षासाठी फक्त १० धनादेश (चेक) निशुल्क उपलब्ध केले जाणार आहेत. जर त्यापेक्षा जास्त चेक हवे असतील तर त्यासाठी आणखीन पैसे द्यावे लागतील. वर्षभरात दुसरे चेकबुक हवे असल्यास खातेदाराला १० चेकसाठी ४० रुपये अधिक जीएसटी आणि २५ चेकसाठी ७५ रुपये आणि जीएसटीचा द्यावे लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT