कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी अमेरिकेची भारताला 4.1 कोटी डॉलरची मदत

हा अतिरिक्त पाठिंबा असूनही, यूएसएआयडी आरोग्य पुरवठा तसेच इलेक्ट्रॉनिक आरोग्य माहिती प्रणालीस समर्थन देईल, लस विकासाच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल आणि खाजगी क्षेत्राद्वारे साहित्य वितरणासही समर्थन देईल.
Narendra Modi and Jo Biden
Narendra Modi and Jo BidenDainik Gpmantak
Published on
Updated on

भारत देशाला भविष्यात कोरोना महामारीसारख्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन आरोग्य सेवेला अमेरिकेने 4.1 कोटी डॉलर इतकी मदत जाहीर केली आहे. या मदतीसह अमेरिकेने आतापर्यंत भारताला 20 कोटी डॉलर इतकी मदत केली आहे.

ही मदत जाहीर करताना अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने म्हटले आहे की, भारताची गरज लक्षात घेता अमेरिका मदतीसाठी पुढे अली असून कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात अमेरिका आता भारतीय लोकांच्या पाठीशी पूर्णपणे उभी आहे. भारताला 4.1 कोटी डॉलरची अतिरिक्त सहाय्य देण्याची घोषणा आम्ही करत आहोत यामुळे कोविड विरुद्ध भारताची तयारी बळकट होईल व आपत्ती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यास मदत होईल. तसेच अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या सहाय्याने कोरोनाची तपासणी करण्यास मदत करण्याशिवाय या काळात लोकांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाईल.

Narendra Modi and Jo Biden
उत्तराखंड सरकारचा चार धाम यात्रेवरुन यूटर्न!

हा अतिरिक्त पाठिंबा असूनही, यूएसएआयडी आरोग्य पुरवठा तसेच इलेक्ट्रॉनिक आरोग्य माहिती प्रणालीस समर्थन देईल, लस विकासाच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल आणि खाजगी क्षेत्राद्वारे साहित्य वितरणासही समर्थन देईल.

मागील वर्षी भारतात एप्रिल आणि मे मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दररोज तीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत होते त्यामुळे रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन आणि बेड्सची तीव्र कमतरता जाणवत असतानाच , अमेरिकेचे खासदारांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाला भारत हा आपला एक महत्वाचा मित्र देश आहे त्यामुळे कोविड- 19 चा सामना करण्यास भारताला मदत करण्याचे आवाहनही केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com