Spicejet Lay off 
अर्थविश्व

Spicejet अर्थिक संकटात, 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

Spicejet Lay Off: स्पाइसजेट एअरलाइनमध्ये जवळपास 9000 कर्मचारी आहेत, जे 30 विमानांचे संचालक करतात. यापैकी 8 विमाने कंपनीने क्रू आणि पायलटसह परदेशी विमान कंपन्यांकडून भाडेतत्त्वावर घेतली आहेत.

Ashutosh Masgaunde

Spice Jet in financial crisis, lays off 1400 employees:

देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन्सपैकी एक असलेल्या स्पाइसजेटने 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 15 टक्के आहे. आर्थिक संकटात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

माहितीनुसार, स्पाइसजेट एअरलाइनमध्ये जवळपास 9000 कर्मचारी आहेत, जे 30 विमानांचे संचालक करतात. यापैकी 8 विमाने कंपनीने क्रू आणि पायलटसह परदेशी विमान कंपन्यांकडून भाडेतत्त्वावर घेतली आहेत.

इकॉनॉमिक टाईम्समध्ये असे वृत्त आहे की, कंपनीने ऑपरेशनल गरजेनुसार ही कपात केली आहे. विमान कंपनी सध्या आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा 60 कोटी रुपये पगार देत आहे.

यापूर्वी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, स्पाइसजेट गेल्या अनेक महिन्यांपासून पगार देण्यास विलंब करत आहे. तसेच स्पाईस जेट गुंतवणूकदारांकडून 2200 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

कंपनीच्या निधी उभारणीच्या सर्व योजना मार्गी लागल्या असून, त्याबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असे एअरलाइन्सच्या वतीने सांगण्यात आले.

2019 मध्ये स्पाइसजेटकडे 118 विमाने आणि 16,000 पेक्षा जास्त कर्मचारी होते. सध्या आकासा एअरलाइन ही स्पाईसजेटची सर्वात जवळची स्पर्धक आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. NSE वर सकाळी 11 वाजता शेअर 4 टक्क्यांनी घसरून 65.59 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता.

कंपनीच्या समभागांनी आजच्या सत्रात 65.05 रुपयांची नीचांकी आणि 68.97 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT