LIC गुंतवणूकदारांची होणार चांदी, कंपनीला मिळणार 25,564 कोटी रुपये

LIC Share: या कालावधीत कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 86,146.47 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
LIC
LIC Dainik Gomantak
Published on
Updated on

Income Tax Appellate Tribunal (ITAT) of the Income Tax Department had issued a refund notification of Rs 25,464.46 crore for LIC:

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ला चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 25,464 कोटी रुपये मिळू शकतात. कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी ही माहिती दिली.

गेल्या महिन्यात, प्राप्तिकर विभागाच्या आयकर अपील न्यायाधिकरणाने (ITAT) 25,464.46 कोटी रुपयांच्या परताव्याची अधिसूचना जारी केली होती.

मोहंती पुढे म्हणाले की, आम्ही काही काळ यावर काम करत होतो. चालू तिमाहीत आम्हाला परतावा मिळण्याची आशा आहे. हा परतावा पॉलिसी धारकाच्या अंतरिम बोनसशी जोडलेला असल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.

LIC ने गेल्या तिमाहीत नवीन प्रोडक्ट्स लाँच केली होती. यामध्ये एलआयसी जीवन उत्सव, इंडेक्स प्लॅनसह अनेक नवीन प्रोडक्ट्सचा समावेश आहे.

यामुळे कंपनीला नवीन व्यवसाय मिळण्यास खूप मदत झाली आहे. यासोबतच, LIC चालू तिमाहीत बाल संरक्षणासह अनेक नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करण्याचे काम करत आहे.

LIC
LIC Index Plus: आता विम्यासोबत मिळणार शेअर मार्केटचाही फायदा, एलआयसीने लॉन्च केला नवा प्लॅन

एलआयसीच्या डिसेंबर तिमाही निकालांमध्ये कंपनीच्या नफ्यात 49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीने 9,444 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो पूर्वी 6,334 कोटी रुपये होता.

कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न वाढून 1,17,017 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 1,11,788 कोटी रुपये होते.

एलआयसीचे एकूण उत्पन्नही वाढून 2,12,447 कोटी रुपये झाले आहे. यापूर्वी ते 1,96,891 कोटी रुपये होते. कंपनीने डिसेंबर तिमाहीत प्रति शेअर 4 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

LIC
पुढील आठवड्यात 4 IPO मध्ये पैसे लावण्याची संधी, जाणून घ्या कशावर खेळायचा डाव

एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत मल्टीबॅगर परतावा देण्यात आघाडीवर राहिली आहे. केवळ गेल्या 5 दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये, LIC मार्केट कॅपने 7 लाख रुपयांची पातळी गाठलीस परंतु नंतर ती थोडी कमी झाली आणि शेवटी संपूर्ण आठवड्यात ती 6,83,637.38 कोटी रुपयांपर्यंत वाढली.

या कालावधीत कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 86,146.47 कोटी रुपयांची वाढ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com