RBI On 2000 Rupee Notes Dainik Gomantak
अर्थविश्व

अजूनही 10 हजार कोटी रूपयांच्या 2000 च्या नोटा परत येणे बाकी; RBI ची माहिती

Akshay Nirmale

RBI On 2000 Rupee Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार 2000 रुपयांच्या बहुतांश नोटा पुन्हा आरबीआयकडे परत जमा झालेल्या असल्या तरी 10,000 कोटी रुपयांच्या नोटा अद्यापही आरबीआयकडे परतलेल्या नाहीत.

तथापि, या नोटाही परत मिळतील किंवा जमा होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरबीआयने 6 ऑक्टोबर रोजी माहिती दिली होती की सुमारे 12000 कोटी रुपयांच्या अशा नोटा अजूनही चलनात आहेत आणि त्या आरबीआयकडे परत आलेल्या नाहीत.

यापुर्वी गव्हर्नर दास यांनी 2,000 रुपयांच्या 87 टक्के नोटा बँकांमध्ये ठेवी म्हणून परत आल्या आहेत, अशी माहिती दिली होती.

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना शक्तीकांत दास म्हणाले की, "2000 रुपयांच्या नोटा परत येत आहेत आणि आता फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात उरल्या आहेत. या नोटाही परत येतील, अशी आशा आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची विशेष मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. 7 ऑक्टोबरनंतर बँक शाखांमध्ये नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची सुविधा बंद करण्यात आली.

8 ऑक्टोबरपासून लोकांना रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये नोटा बदलून देण्याची किंवा त्यांच्या बँक खात्यात तितकीच रक्कम जमा करण्याची सुविधा देण्यात आली होती.

एक व्यक्ती किंवा संस्था एकावेळी 2000 रुपयांच्या केवळ २० नोटाच बँकेतून बदलून घेऊ शकते. तथापि, RBI कार्यालयांद्वारे 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी रकमेवर मर्यादा नाही.

RBI ने या वर्षी 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT