Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Mukesh Ambani: मुकेश अंबानींनी 24 तासात कमावले 19,000 कोटी, अब्जाधीशांच्या यादीत...

Mukesh Ambani Networth: मुकेश अंबानी पुन्हा एकदा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत.

Manish Jadhav

Mukesh Ambani Networth: मुकेश अंबानी पुन्हा एकदा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. अंबानींनी अवघ्या एका दिवसात 19,000 कोटींची कमाई केली असून त्यानंतर ते ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये 13 व्या स्थानी पोहोचले आहेत.

टॉप-10 मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना सध्या 3 उद्योगपतींना मागे सोडावे लागणार आहे. हे काम करायला जास्त वेळ लागणार नाही कारण त्यांच्या आणि इतरांच्या संपत्तीत फारसे अंतर नाही.

24 तासांत संपत्ती $2 अब्ज पेक्षा जास्त वाढली

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वाढीनंतर अंबानींची एकूण संपत्ती $90 अब्जच्या पुढे गेली आहे. या संपूर्ण वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत मुकेश अंबानींना $3.46 बिलियन नेट वर्थचा नफा झाला आहे.

अंबानी यांच्यापुढे कोण?

दरम्यान, या यादीत 12व्या स्थानावर फ्रान्सचे फ्रँकोइस बेटान्कोर्ट मीर्स आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $92.6 अब्ज आहे. याशिवाय मेक्सिकोचे कार्लोस स्लिम 11व्या स्थानावर आहेत, ज्यांची संपत्ती सुमारे $97.2 अब्ज आहे. त्याचवेळी, 10 व्या स्थानावर अमेरिकेचे सेर्गे ब्रिन आहेत, ज्यांची मालमत्ता $ 104 अब्जच्या जवळपास आहे.

गौतम अदानी 21 व्या स्थानावर

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीत अंबानींचे स्थान 13 वे आहे. असे मानले जात आहे की, ते लवकरच टॉप-10 मध्ये स्थान मिळवू शकतात. जर गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, ते या यादीत 21 व्या स्थानावर आहेत. श्रीमंतांच्या यादीतही ते टॉप-20 मधून बाहेर पडले आहेत.

या यादीत टेस्लाचे सीईओ पहिल्या क्रमांकावर आहेत

टेस्लाचे सीईओ एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत. त्यांची संपत्ती सुमारे 247 अब्ज डॉलर्स आहे. या वर्षात आतापर्यंत त्यांची संपत्ती $110 बिलियन झाली आहे, ज्यापैकी त्याने अवघ्या 24 तासात $13 बिलियन कमावले आहेत.

मार्क झुकेरबर्ग दुसऱ्या क्रमांकावर

या यादीत मेटाचा मार्क झुकेरबर्ग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने या वर्षात आतापर्यंत $ 58.6 बिलियन कमावले आहेत आणि बऱ्याच काळानंतर या यादीत सामील झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

SCROLL FOR NEXT