Mukesh Ambani विकणार 50 वर्षे जुने 'हे' खास पेय, कोका-कोला अन् पेप्सीला देणार टक्कर!

Reliance Industries Limited: रिलायन्स आपला व्यवसाय झपाट्याने वाढवत आहे. आता कंपनीने 50 वर्षे जुने पेय नव्या शैलीत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mukesh Ambani
Mukesh AmbaniDainik Gomantak

Reliance Industries Limited: रिलायन्स आपला व्यवसाय झपाट्याने वाढवत आहे. आता कंपनीने 50 वर्षे जुने पेय नव्या शैलीत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Reliance Consumer Products Limited (RCPL) ने गुरुवारी कॅम्पा कोला, देशातील 50 वर्षे जुने प्रतिष्ठित पेय ब्रँड पुन्हा सादर करण्याची घोषणा केली. RCPL ही मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे.

जानेवारीत ड्रिंक्स ग्रुपही खरेदी करण्यात आला

रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) दैनंदिन वापरातील वस्तूंचे व्यवहार करते. ही FMCG कंपनी आहे.

विशेष म्हणजे, या वर्षी जानेवारीमध्ये, RCPL ने गुजरात स्थित कार्बोनेटेड शीतपेय आणि ज्यूस बनवणाऱ्या सोशियो हझुरी बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 50 टक्के हिस्सा विकत घेतला. यापूर्वी, त्यांनी प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून कॅम्पा ब्रँड 22 कोटी रुपयांना विकत घेतला होता.

Mukesh Ambani
Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना टाकले मागे, जगातील टॉप टेन श्रीमंतांमध्ये समावेश...

नवीन फ्लेवर मध्ये लॉन्च केले जाईल

आता RCPL ने कॅम्पा ब्रँड पुन्हा सादर केला आहे. कंपनीकडून निवेदन जारी करुन सांगण्यात आले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज या तीन नवीन फ्लेवर्सचा शीतपेयांच्या श्रेणीमध्ये समावेश केला जाईल.

कॅम्पा-कोला हा 1970 आणि 1980 च्या दशकात एक लोकप्रिय शीतपेय

आधी ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये (Telangana) उपलब्ध होईल. नंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात ते सादर केले जाईल. कॅम्पा-कोला हा 1970 आणि 1980 च्या दशकात एक लोकप्रिय शीतपेय ब्रँड होता, परंतु कोका-कोला आणि पेप्सिकोच्या आगमनानंतर तो मागे पडला.

Mukesh Ambani
Mukesh Ambani: भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काय म्हणाले मुकेश अंबानी, वाचा सविस्तर

पेप्सिको आणि कोका-कोला यांच्यात स्पर्धा होईल

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरसीपीएलने याला 'द ग्रेट इंडियन टेस्ट' असे नाव दिले आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कॅम्पा हा देशांतर्गत ब्रँड पेप्सिको आणि कोका-कोला या जगातील दोन मोठ्या कंपन्यांशी थेट स्पर्धा करेल.

Mukesh Ambani
Mukesh Ambani Latest News: उद्योगपती मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्याला अटक, मुंबईत होणार चौकशी

कंपनीच्या प्रवक्त्याने माहिती दिली

कॅम्पाच्या लाँचिंगच्या वेळी बोलताना RCPL चे प्रवक्ते म्हणाले की, “आम्हाला अपेक्षा आहे की, ग्राहकांच्या नवीन पिढीने कॅम्पाचा हा नवीन अवतार स्वीकारावा आणि तरुण ग्राहकांना (Customers) नवीन चव आवडेल.'' जलद गतीने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत जास्त वापरामुळे कॅम्पासाठी भरपूर संधी आहेत, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com