Reliance Jio: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि त्यांचे दूरसंचार युनिट Jio Infocomm यांनी सर्वात मोठे सिंडिकेट लोन घेतले आहे. हे कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठ्या सिंडिकेट लोनचे प्रतिनिधित्व करते.
रिलायन्स इंडस्ट्रीजने दोन वेळा विविध बँक समूहाकडून पाच अब्ज डॉलर्सचे घेतले आहे. सिंडिकेट लोन जे बँक / वित्त संस्था किंवा समूहाकडून घेतले जाते.
सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात रिलायन्सने 55 बँकांकडून 3 अब्ज डॉलर्सचे लोन घेतले होते. रिलायन्स जिओ इन्फोकॉमने 18 बँकांकडून दोन अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज घेतले आहे.
त्यांनी सांगितले की, 31 मार्चपर्यंत $3 अब्ज कर्ज (Loan) घेतले होते, तर या आठवड्यात मंगळवारी $2 अब्जचे सिंडिकेट लोन घेतले आहे. 5G नेटवर्क सुरु करण्यासाठी पैसे खर्च केले जातील.
तसेच, रिलायन्स (Reliance) जिओ या लोनची रक्कम भांडवली खर्चासाठी वापरणार आहे. हा पैसा जिओ देशभरात 5G नेटवर्क सुरु करण्यासाठी खर्च करेल.
सूत्रांनी सांगितले की, तैवानमधील सुमारे दोन डझन बँकांसह, तसेच बँक ऑफ अमेरिका, HSBC, MUFG, Citi, SMBC, Mizuho आणि Credit Agricole या जागतिक बँकांसह 55 क्रेडिट एग्रिकोलकडून प्रारंभिक $3 अब्ज कर्ज घेतले आहे.
तसेच, प्राथमिक कर्जाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दोन अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर 55 कर्जदारांकडून दोन अब्ज डॉलर्सचे नवीन कर्जही याच अटींवर घेण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.