RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

पेटीएम पेमेंट्स बँकेला RBI ने ठोठावला 5.39 कोटींचा दंड, जाणून घ्या कारण

RBI ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला नो योर कस्टमर (KYC) निकषांसह काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Manish Jadhav

RBI Action on Paytm Payments Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला नो योर कस्टमर (KYC) निकषांसह काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. देशाच्या सेंट्रल बँकेने आज ही माहिती दिली.

सायबर सेफ्टी फ्रेमवर्कशी संबंधित काही त्रुटी बँकांमध्ये आढळून आल्या

रिझव्‍‌र्ह बँकेला असे आढळून आले की, पेमेंट बँकांचा परवाना, बँकांमधील सायबर सुरक्षा फ्रेमवर्क आणि UPI इकोसिस्टमसह मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन्स सुरक्षित करण्याशी संबंधित काही तरतुदींसाठी आरबीआय (RBI) मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करण्यात काही उणीवा आढळून आल्या.

ऑडिटर्स पेटीएम पेमेंट्स बँकेचे सर्वसमावेशक ऑडिट करतात

अधिकृत विधानानुसार, बँकेच्या KYC/अँटी मनी लाँडरिंगच्या (Money Laundering) दृष्टीकोनातून विशेष तपासणी करण्यात आली आणि RBI द्वारे निवडलेल्या लेखापरीक्षकांद्वारे बँकेचे सर्वसमावेशक लेखापरीक्षण करण्यात आले.

आरबीआयच्या निवेदनानुसार, अहवालाची तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, पेटीएम पेमेंट्स बँक पेमेंट सेवा प्रदान करण्यात गुंतलेल्या संस्थांबाबत लाभार्थी ओळखू शकली नाही.

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली

निवेदनात म्हटले आहे की, बँकेने पेमेंट व्यवहारांचे परीक्षण केले नाही आणि पेमेंट सेवांचा लाभ घेत असलेल्या संस्थांच्या जोखमीचे मूल्यांकन केले नाही.

मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, "Paytm पेमेंट्स बँकेने पेमेंट सेवांचा लाभ घेत असलेल्या काही ग्राहकांच्या अॅडव्हान्स खात्यांमध्ये दिवसाच्या शेवटच्या शिल्लक रकमेच्या नियामक मर्यादेचे उल्लंघन केले आहे." यानंतर बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

आरबीआयने बँकेवर दंड ठोठावला

पेटीएम पेमेंट्स बँकेचे उत्तर मिळाल्यानंतर, आरबीआय या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचा बँकेवरील आरोप सिद्ध झाला आहे. यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेवर आर्थिक दंड ठोठावण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT