RBI MPC Meeting: आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरवात; 6 ऑक्टोबर रोजी व्याजदर जाहीर होणार...

मे 2022 पासून RBI ने पॉलिसी रेट 2.50 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत
RBI MPC Meeting
RBI MPC MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या 3 दिवसीय बैठकीला सुरवात झाली आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. आता 6 ऑक्टोबर रोजी गव्हर्नर व्याजदरांबाबत भूमिका स्पष्ट करतील. आरबीआय रेपो दरात कोणताही बदल करणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सलग चौथ्या आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआय रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेईल, अशी आशा आहे. किरकोळ चलनवाढीचा दर जुलै 2023 मध्ये 7.44 टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये 6.83 टक्क्यांवर आला आहे.

सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचे आकडे 12 ऑक्टोबरला जाहीर होण्यापूर्वी, RBI रेपो दराबाबत निर्णय जाहीर करेल. पण सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर आणखी खाली येण्याची आशा बाजाराला आहे.

पण या पावसाळ्यात असामान्य पाऊस आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ हे आरबीआयसमोर आव्हान राहिले आहे.

RBI MPC Meeting
गोवा सरकार गुणवंत विद्यार्थ्यांना देतेय मोफत लॅपटॉप; अर्ज करण्यासाठी 5 ऑक्टोबरची मुदत

यापूर्वी कमी पावसामुळे खरीप पिक आणि रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने अन्नधान्य महागाईत वाढ दिसून आली. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने ही कमतरता भरून काढली आहे. आणि आता चांगले रब्बी पीक अपेक्षित आहे.

अशा परिस्थितीत जर अन्नधान्य महागाईबरोबरच मूळ महागाई कमी झाली असेल तर आरबीआयकडून दिलासा मिळेल. किरकोळ महागाई अजूनही RBI च्या सहिष्णुता बँड 6 टक्क्यांच्या वरच्या पातळीच्यावर आहे. आरबीआयने महागाई दर 4 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

RBI MPC Meeting
Goa Crime: फोंड्यात 15 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; परप्रांतीय तरूणाला अटक

महागाईचा दर ही पातळी गाठल्यानंतरच महागड्या कर्जातून सुटका मिळण्याची आशा आहे. मात्र, सद्यस्थितीत हे फार दूरचे वाटते.

मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत, RBI ने पॉलिसी रेट रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. गेल्या दोन वर्षांत लोकांचे गृहकर्ज EMI 20 टक्क्यांनी महाग झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com