Ration Shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Ration Scheme: मोफत राशन घेणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने जारी केला नवा अध्यादेश

Ration Card Latest News: केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात मोफत राशन मिळवण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Free Ration Scheme: शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात मोफत राशन मिळवण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. आता मोफत राशन घेणाऱ्यांसाठी UIDAI कडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम देशातील करोडो जनतेवर होणार आहे. आता कोणते नियम बनवले आहेत, ते जाणून घेऊया...

आधारद्वारे रेशन घेता येते

देशभरात आधार जारी करणाऱ्या संस्थेने म्हटले की, 'आता तुम्ही देशात कुठेही आधारद्वारे राशन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.'

ट्विट करुन माहिती दिली

UIDAI कडून ट्विट करुन माहिती देण्यात आली की, 'आता फक्त आधारच्या आधारे राशनची सुविधा देशात कुठेही उपलब्ध होणार आहे. मात्र, तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट झाल्यावरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. असे झाले नाही तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय तुम्हाला शिधापत्रिकेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही 1947 वर संपर्क साधू शकता.'

21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत मिळतात

सरकारने (Government) अंत्योदय धारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सामान्य शिधापत्रिकाधारकांना फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळेल. मात्र, यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे 2 रुपये आणि तांदळासाठी 3 रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT