Free Ration घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! या घोषणेचा थेट फायदा होणार करोडो लोकांना

Ration Card List: गरिबांच्या हितासाठी सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.
Free Ration
Free RationDainik Gomantak

Ration Card: गरिबांच्या हितासाठी सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यासोबतच गरीबांना मोफत किंवा कमी दरात राशन देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, मोफत राशन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय अन्न महामंडळ (FCI) गोदामांमध्ये अन्न सुरक्षा, मोफत राशन योजना PMGKAY आणि इतर कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत खाद्यान्नाची पूर्तता पूर्ण करण्यासाठी 44 दशलक्ष टन इतके अन्नधान्य आहे.

इतके धान्य उपलब्ध आहे

खाद्य मंत्रालयाने सांगितले की,1 एप्रिल 2023 पर्यंत सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर सुमारे 11.30 दशलक्ष टन गहू आणि 23.6 दशलक्ष टन तांदूळ उपलब्ध होईल. त्याचवेळी, मंत्रिमंडळाने (Cabinet) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) तीन महिन्यांसाठी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यासाठी 44,762 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Free Ration
Free Ration: पुढील 6 महिने मिळणार मोफत राशन! केंद्र सरकार घेऊ शकते मोठा निर्णय

अन्नधान्याचा पुरेसा साठा

"राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), इतर योजना आणि PMGKAY च्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यासाठी FCI कडे पुरेसा अन्नधान्याचा साठा आहे," असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. या पूलमध्ये सुमारे 23.2 दशलक्ष टन गहू आणि 209 दशलक्ष टन तांदूळ आहे.

Free Ration
Ration Card: राशनकार्डधारकांसाठी धक्का देणारी बातमी, यादीतून कट होणार तुमचे नाव!

इतका खर्च केला

अलीकडेच सरकारने (Government) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर अशी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. त्याच वेळी, या योजनेच्या शेवटच्या सात टप्प्यांमध्ये, एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत, 3.91 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असून 1,121 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरित करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com