Free Ration Scheme: केंद्र सरकार लवकरच सर्वसामान्यांना मोठी भेट देणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) लाभार्थ्यांना सरकार पुढील 6 महिन्यांसाठी मोफत राशनचा लाभ देऊ शकते, म्हणजेच मोफत राशनची सुविधा येत्या 6 महिन्यांसाठी वाढवण्यात येऊ शकते. सरकार लवकरच 30 सप्टेंबरपासून मोफत राशन देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना वाढवण्याची घोषणा करु शकते.
योजना 3 ते 6 महिन्यांसाठी वाढवता येऊ शकते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार (Government) सध्या गरिबांना मोफत 5 किलो धान्य देत आहे. असे मानले जाते की, सरकार पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी ते आणखी वाढवू शकते. तथापि, यामुळे सरकारला मोठी तरतूद करावी लागणार आहे.
खाद्य सचिवांनी माहिती दिली
सोमवारी माहिती देताना खाद्य सचिव सुधांशू पांडे (Food Secretary Sudhanshu Pandey) म्हणाले की, सरकार मोफत राशन योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, यासंदर्भात निर्णय कधी घेतला जाणार याबाबत अधिकृत माहिती नाही.
सुविधा कधी सुरु झाली?
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मार्च 2020 पासून मोफत राशन देण्याची मोहीम सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत राशन देण्यात आले. सरकारकडून सर्वसामान्यांना दरमहा 5 किलो मोफत राशन दिले जात आहे. सध्या या योजनेला सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली असून ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.