Raksh Bandhan  Dainik Gomantak
अर्थविश्व

Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला गिफ्ट करा Bank FD, मिळेल एवढ्या टक्क्यांहून अधिक व्याज!

Raksha Bandhan 2023: या रक्षाबंधनाला तुम्ही बहिणीला कोणते गिफ्ट द्यायचे याबाबत गोंधळून गेला आहात का? तसे असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही.

Manish Jadhav

Raksha Bandhan 2023: या रक्षाबंधनाला तुम्ही बहिणीला कोणते गिफ्ट द्यायचे याबाबत गोंधळून गेला आहात का? तसे असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. आज आम्ही तुम्हाला बहिणींसाठी एक अशी गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या बहिणीला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. यावेळी तुम्ही तुमच्या बहिणीला भेट म्हणून बँक एफडी देऊ शकता. आजही अशा अनेक बँका आहेत, ज्या 8 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत.

रक्षाबंधन गिफ्टमध्ये तुम्ही कोणत्या बँकेतून मुदत ठेव मिळवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

जर तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावावर या बँकेत FD केली असेल तर तुम्हाला एक वर्षाच्या कालावधीसाठी 6.85% दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. त्याचवेळी, 3 वर्षांच्या कालावधीत 8.60 टक्के दराने व्याज मिळत आहे. याशिवाय 5 वर्षांच्या एफडीवर 8.25 टक्के दराने व्याज मिळत आहे.

2. युनिटी स्मॉल फायनान्स बँक

ही बँक एका वर्षाच्या कालावधीसाठी 7.35 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय 2 वर्षांच्या कालावधीसाठी 7.65 टक्के आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.65 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

3. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 1 वर्षाच्या कालावधीसाठी ग्राहकांना 7.50 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय 3 वर्षांच्या कालावधीसाठी 8.00 टक्के आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी 8.00 टक्के दराने व्याज मिळत आहे.

4. जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक 1 वर्षाच्या कालावधीसाठी ग्राहकांना 8.00 टक्के दराने व्याज देत आहे. त्याचवेळी, 3 वर्षांच्या कालावधीसाठी 8.50 टक्के आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

5. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

ही बँक एका वर्षाच्या एफडीसाठी 8.25 टक्के, 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.20 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय ग्राहकांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.20 टक्के दराने व्याज मिळत आहे.

6. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना एक वर्षाच्या कालावधीसाठी 8.00 टक्के दराने व्याज देत आहे. यामध्ये ग्राहकांना 3 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 8.50 टक्के दराने व्याज मिळत आहे. त्याचवेळी, 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.50 टक्के दराने व्याज मिळत आहे.

बहिणीला कोणत्याही बँकेची एफडी तुम्ही गिफ्ट करु शकता

दरम्यान, या बँका ग्राहकांना 8 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. जर तुम्ही तुमच्या बहिणीला फिक्स डिपॉझिट गिफ्ट करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही यापैकी कोणत्याही बँकेत FD करु शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कालावधी निवडू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT