Banking System: SBI-HDFC-ICICI बँक ग्राहकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी, बँकिंग व्यवस्था...!

Nirmala Sitharaman on Banking System: बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी अनेक वेळा अनेक फेऱ्या माराव्या लागतात. तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का?
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Dainik Gomantak
Published on
Updated on

Nirmala Sitharaman on Banking System: बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी अनेक वेळा अनेक फेऱ्या माराव्या लागतात. तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का? जर होय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

अर्थमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांत दिलेल्या आदेशानंतर बँकांमध्ये खेटे घालणाऱ्यांसाठी दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी ही घोषणा केल्यापासून, बँकिंग प्रणाली ग्राहोपयोगी बनली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग प्रणाली ग्राहकांसाठी अनुकूल करण्याचे आदेश दिले आहेत.

बँकिंग व्यवस्था सोपी करा असे सांगितले

बँक ग्राहकांच्या (Customers) गरजेनुसार बँकिंग व्यवस्था सोपी करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले. अशा बदलांनंतर अधिकाधिक ग्राहक बँकांशी संपर्क साधू शकतील. बँकांनी ग्राहकांच्या सुविधांकडे लक्ष द्यावे, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले. त्यामुळे कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ होईल. त्याचबरोबर, अर्थमंत्र्यांनी बँकांना कर्ज देण्याचे मानके योग्य असावेत असेही सांगितले.

Nirmala Sitharaman
Bank Account Minimum Balance: SBI-HDFC-ICICI बँकेसाठी मोठी बातमी, दंड टाळण्यासाठी आजच करा 'हे' काम

यादरम्यान सीतारामन यांनी सर्व मोठ्या बँकांना याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या या सूचनेमुळे आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि एचडीएफसी बँकेसह सर्व बँकांच्या ग्राहकांना फायदा होणार आहे. बँकिंग व्यवस्था अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्याची गरज असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. तुम्हाला ग्राहकांच्या सुविधांची काळजी घ्यावी लागेल, असेही अर्थमंत्र्यांनी शेवटी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com