State Bank of India FD Scheme: SBI ने ग्राहकांना पुन्हा दिली खूशखबर, 'या' योजनेत आता जबरदस्त फायद्यांसह...

State Bank of India FD Scheme: जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल.
State Bank of India
State Bank of India Dainik Gomantak

State Bank of India FD Scheme: जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. होय, जास्त व्याज असलेल्या FD योजनेचा कालावधी SBI ने वाढवला आहे.

यापूर्वी ही गुंतवणूक 15 ऑगस्टपर्यंत करायची होती. SBI ने आपल्या विशेष FD स्कीम 'अमृत कलश' ची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे.

SBI च्या वेबसाइटनुसार, या 400 दिवसांच्या विशेष FD योजनेत, नियमित ग्राहकांना 7.1% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.6% दराने व्याज मिळते.

तुम्ही किती काळ गुंतवणूक करु शकता

दरम्यान, SBI अमृत कलश मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, या योजनेंतर्गत एफडी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत करायची होती.

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 400 दिवसांच्या (अमृत कलश) विशेष एफडी योजनेत 12 एप्रिल ते 2023 पर्यंत 7.10% दराने व्याज मिळत आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) योजनेअंतर्गत 7.60% दराने व्याज मिळते.

State Bank of India
State Bank of India: एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, उद्यापासून बंद होणार 'ही' पाप्युलर स्कीम

SBI अमृत कलश योजनेची वैशिष्ट्ये

एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, अनिवासी भारतीय या एफडी योजनेत गुंतवणूक (Investment) करु शकतात. विशेष एफडी योजनेंतर्गत, एफडी परिपक्व झाल्यावरच लाभार्थ्याला व्याजाचे पैसे दिले जातात. TDS कापल्यानंतर मिळणारे व्याज तुमच्या खात्यात जमा केले जाते.

State Bank of India
State Bank Of India ची मोठी घोषणा, कोट्यवधी शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट; हे काम लगेच करा !

दुसरीकडे, जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी FD मधून पैसे काढले, तर तुम्हाला ठेवीच्या वेळी लागू असलेल्या दरापेक्षा 0.50% ते 1% कमी किंवा ठेवीच्या कालावधीसाठी करार केलेल्या दरापेक्षा 0.50% किंवा 1% कमी (जे कमी असेल) मिळेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य नागरिकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 3% ते 7% (अमृत कलश वगळता) व्याजदर देत आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50% ते 7.50% पर्यंत व्याजदर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com