Post Office Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office: पोस्टात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 5,000 रुपये गुंतवून मिळवा 8 लाख!

Post Office RD: पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय पोस्ट ऑफिस आहे.

दैनिक गोमन्तक

Post Office RD: पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय पोस्ट ऑफिस आहे. चांगल्या परताव्यासह, मनी बॅक गॅरंटी देखील येथे उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडी (रिकरिंग डिपॉझिट) बद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही 5,000 रुपये गुंतवून करोडपती बनू शकता.

सध्या तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (Post Office) 5 वर्षांच्या आरडीवर 5.8 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेत तुम्हाला किमान 100 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्ही एकच खाते देखील उघडू शकता. यासोबतच 3 प्रौढ व्यक्तींना एकत्रितपणे संयुक्त खाते उघडता येईल. या योजनेत तुम्हाला 10 च्या पटीत पैसे जमा करावे लागतील. त्यात तुम्हाला वेळेवर पैसे जमा करावे लागतील. जर तुम्ही त्याचा हप्ता देण्यास उशीर केला किंवा विसरलात तर तुम्हाला लेट फी देखील भरावी लागेल.

दुसरीकडे, तुम्ही या योजनेत दरमहा 5000 रुपये जमा केल्यास आणि तुम्हाला योजनेवर 5.8 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. जर तुम्ही 5 वर्षे गुंतवणूक (Investment) केली तर तुम्हाला 3 लाख 48 हजार 480 रुपये मिळतील. यामध्ये तुमची ठेव रक्कम 3 लाख रुपये असेल. त्याचवेळी, तुम्हाला यावर सुमारे 16 टक्के परतावा मिळेल. नियमांनुसार तुम्ही ही योजना 5 वर्षांसाठी वाढवू शकता.

शिवाय, जर तुम्ही ही योजना 5 वर्षांसाठी वाढवली तर तुमची आरडी 10 वर्षांसाठी असेल. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर 8 लाख 13 हजार 232 रुपये मिळतील. यामध्ये एकूण जमा रक्कम 6 लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला व्याजाचा लाभ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ T20: अभिषेक-सॅमसन जोडीचा धमाका! रोहित-राहुलचा मोडला 6 वर्ष जुना रेकॉर्ड; न्यूझीलंडमध्ये रचला नवा कीर्तिमान

Mohan Bhagwat Vijayadashami Speech: मोहन भागवतांचा 'विश्वगुरू भारताचा' मंत्र; विविधतेचा स्वीकार, समतोल विकास आणि संस्कारांवर भर

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

SCROLL FOR NEXT