Post Office: पोस्टाची 'ही' योजना आहे किफायतशीर; मॅच्युरिटीनंतर मिळेल 14 लाखांचा परतावा

देशातील कोट्यवधी लोकांनी पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.
Post Office
Post OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

प्रत्येकाला आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असतं. म्हणूनच अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजनांमध्ये (Saving Schemes) गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस देखील अनेक प्रकारच्या बचत योजना चालवतं. देशातील कोट्यवधी लोकांनी पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. कारण त्यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते, असा समज आहे. आतापर्यंत पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना जाहीर करण्यात आल्यात, त्यापैकी अनेक गुंतवणुकीच्या योजना लोकप्रियही झाल्या आहेत.

'सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना' (Sumangal Rural Postal Life Insurance).-

ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. 19 ते 45 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती सुमंगल ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. या योजनेत दोन मॅच्युरिटी पीरियड्स आहेत. पॉलिसीधारक 15 वर्ष किंवा 20 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी निवडू शकतात.

मनी बॅक सिस्टिम-

15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी अंतर्गत, 6, 9 आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यावर विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम परत मिळेल. तर, 20 वर्षांच्या मॅच्युरिटीवर, विमाधारकाला 8, 12, 16 वर्ष पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतात. उर्वरित 40 टक्के रक्कम मॅच्युरिटीवर बोनससोबत गुंतवणूकदाराला मिळते. 25 वर्षांच्या व्यक्तीनं 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 20 वर्षांची पॉलिसी घेतल्यास, त्याला दररोज 95 रुपये प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच, एका महिन्यात 2850 रुपये आणि 6 महिन्यांत 17,100 रुपये भरावे लागतील. मॅच्युअर झाल्यानंतर ही रक्कम 14 लाख रुपये होईल.

Post Office
Aadhaar चा नवा नियम, अ‍ॅडरेसच्या पुराव्याशिवाय करता येणार मोठा बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

Post Office Savings : 14 लाखांचा परतावा कसा मिळवाल? 

20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह, विमा रकमेच्या 20 टक्के रक्कम आठव्या, बाराव्या आणि 16व्या वर्षांत कॅशबॅक म्हणून मिळेल. 7 लाखांपैकी 20 टक्के रक्कम म्हणजे, 1.4 लाख रुपये. ही रक्कम तीन वेळा भरल्यानंतर एकूण 4.2 लाख रुपये होतील.

त्यानंतर 20 व्या वर्षी तुम्हाला 2.8 लाख रुपये मिळतील. यासह, निश्चित कालावधीची रक्कम पूर्ण होईल. यानंतर, तुम्हाला वार्षिक 48 रुपये प्रति हजार बोनस म्हणून मिळतील. याचप्रमाणे, 20 वर्षांत ही रक्कम 6.72 लाख रुपये होईल. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 9.52 लाख रुपये मिळतील. मनी बॅक आणि मॅच्युरिटी मिळून मिळून 13.72 लाख रुपये इतकी रक्कम होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com