Post Office Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Scheme: पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार देतेय एवढे लाख

Post Office Scheme Update: अलीकडे केंद्र सरकारने व्याजदरात वाढ केली आहे. आरडी करणाऱ्यांना आता जास्त पैसे मिळतील.

Manish Jadhav

Post Office Scheme: पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही आता पोस्ट ऑफिसमध्ये आरडी (Post Office RD) करण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला जास्त पैसे मिळतील.

अलीकडे केंद्र सरकारने व्याजदरात (Interest Rate) वाढ केली आहे. आरडी करणाऱ्यांना आता जास्त पैसे मिळतील. तसेच, पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा नेहमीच सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.

अधिक व्याज मिळत आहे

केंद्र सरकार पूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) 6.2 टक्के दराने व्याजाचा लाभ देत होते, तो आता 6.5 टक्के करण्यात आला आहे, त्यामुळे आरडी करण्यापूर्वी, तुम्हाला कधी आणि किती व्याज मिळेल हे जाणून घ्या.

2,000 च्या RD वर 1,41,983 उपलब्ध

जर तुम्ही पोस्टात 2000 रुपयांची आरडी केली तर तुम्हाला 12 महिन्यांसाठी 24,000 रुपये गुंतवावे लागतील. समजा तुम्ही 5 वर्षांसाठी RD केली तर तुम्‍हाला सुमारे रु. 1,20,000 द्यावे लागतील, ज्यात तुम्हाला रु. 21,983 इतके व्याज मिळेल. त्यानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1,41,983 रुपये मिळतील.

3000 वर 2,12,972 मिळतील

जर तुम्ही पोस्टात 3000 रुपयांची आरडी केली तर तुम्हाला 12 महिन्यांसाठी 36,000 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही 5 वर्षांसाठी RD केली, तर तुम्हाला सुमारे 1,80,000 द्यावे लागतील, ज्यात तुम्हाला रु. 32,972 व्याज मिळतील. त्यानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर 2,12,972 रुपये मिळतील.

4000 वर 2,83,968 मिळतील

जर तुम्ही पोस्टात 4000 रुपयांची आरडी केली तर तुम्हाला 12 महिन्यांसाठी 48,000 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही 5 वर्षांसाठी RD केली, तर तुम्‍हाला सुमारे 2,40,000 रुपये लागतील, ज्यामध्‍ये तुम्हाला रु. 43,968 व्याज मिळेल. त्यानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर 2,83,968 रुपये मिळतील.

5000 वर 3,54,954 मिळतील

जर तुम्ही पोस्टात 5000 रुपयांची आरडी केली तर तुम्हाला 12 महिन्यांसाठी 60,000 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही 5 वर्षांसाठी RD केली, तर तुम्‍हाला सुमारे 3,00,000 रुपये लागतील, ज्‍यामध्‍ये तुम्हाला रु. 54,954 व्याज मिळेल. त्यानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर 3,54,954 रुपये मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT