Post Office Investment Scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा 16 लाख रूपयांचा परतावा

सलग दहा वर्षे गुंतवणूक केल्यास 16 लाख रूपयांचा परतावा मिळू शकेल.
Post Office Investment Scheme
Post Office Investment SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

Post Office Investment Scheme: उत्तम आणि सुसह्य आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला पैसा हा लागतोच. सध्या गुंतवणूकीचे वारे वाहत आहे. अनेक बँका, शेअर बाजार, बँकेचे बॉन्डस् यात गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवता येतो. पण, पोस्टाच्या देखील अनेक गुंतवणूक योजना आहेत. ज्यातून उत्तम परतावा मिळतो. केवळ या योजना लोकांपर्यंत पोहचत नसल्याने याबाबत माहिती मिळत नसते. पोस्ट विविध गुंतवणूक आणि बचत योजना राबवत असते. अशीच एक पोस्टाची गुंतवणूक योजना आहे, ज्यात सलग दहा वर्षे गुंतवणूक केल्यास 16 लाख रूपयांचा परतावा मिळू शकेल.

Post Office Investment Scheme
Panjim: ख्रिसमस पार्टीला गेलेल्या विद्यार्थिनीवर बसमध्ये बलात्कार, बस चालकाला अटक

आवर्ती ठेव योजना

पोस्टाची 'आवर्ती ठेव योजना' ही अल्पबचत योजना आहे. आवर्ती ठेव योजनेत तुम्ही 1, 2 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांसाठी रक्कम गुंतवता येते. दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवू शकता. जमा रक्कमेवर तुम्हाला दर 3 महिन्याला व्याज दिले जाते. पोस्टाच्या या योजनेत सध्या 5.8 टक्के व्याज मिळते. जेवढा गुंतवणुकीचा कालावधी जास्त तेवढा फायदा मिळतो. 18 वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला आवर्ती ठेव योजनेत खाते उघडता येते. पालकही मुलांच्या नावे या योजनेत खाते उघडू शकतात.

Post Office Investment Scheme
Akshay Kumar Video: अभिनेता अक्षय कुमार गोव्यात; त्यानं दिलेल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा एकदा पाहाच

असा मिळवता येईल 16 लाख रूपयांचा परतावा

आवर्ती ठेव योजनेतून 16 लाख रूपयांचा परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला सलग दहा वर्षे दर महिन्याला 10 हजार रुपये जमा करावे लागतील. म्युच्युअल फंडात जशी SIP द्वारे आपण गुंतवणूक करतो तशाच पद्धतीने ही गुंतवणूक केली जाऊ शकते. याशिवाय या योजनेतून कर्ज देखील घेता येऊ शकते. योजनेतून तुम्हाला एकूण रक्कमेच्या 50 टक्के रक्कम कर्ज घेता येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com