Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' योजनांमधून तुम्हीही व्हाल मालामाल, टॅक्स बचतीसाठी...

Post Office Scheme: तुम्ही लोकांना पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांबद्दल चर्चा करताना ऐकले असेल.
post office
post office Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Post Office Scheme: तुम्ही लोकांना पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांबद्दल चर्चा करताना ऐकले असेल. या योजना दीर्घकालीन बचत आणि जोखीममुक्त गुंतवणूक परतावा प्रदान करतात.

अशा कारणांमुळे लाखो लोक इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत या योजनांची निवड करतात. पोस्ट ऑफिस बचत योजनांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट हा आहे की, त्या सरकार समर्थित आहेत. विशेष म्हणजे, त्या चांगला हमी परतावा देतात.

याशिवाय, या योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर लाभ देखील देतात. पोस्ट ऑफिसच्या (Post Office) काही बचत योजनांवर एक नजर टाकूया, ज्या कर बचतीसाठी देखील मदत करतात...

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने खाते उघडून तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा (Sukanya Samriddhi Yojana) लाभ घेऊ शकता. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर खात्याची मालकी घेऊ शकते.

सुकन्या समृद्धी खात्यावर सध्याचा व्याजदर 7.6 टक्के आहे. एका आर्थिक वर्षात किमान प्रारंभिक ठेव 250 रुपये तर कमाल 1.5 लाख रुपये आहे. सुकन्या समृद्धी योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट प्रदान करते.

post office
Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना फक्त तुमच्यासाठी, सरकार देतेय आकर्षक परतावा!

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

तुमचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खाते उघडू शकता. SCSS चा मॅच्युरीटी कालावधी पाच वर्षांचा असतो आणि त्यावर वार्षिक 8 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेतील कलम 80C कर सवलतीसाठी 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक पात्र आहे.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव खाते

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट इंडिया पोस्टद्वारे ऑफर केले जाते आणि ते बँकेच्या मुदत ठेवीसारखेच असते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट व्याज दरांचे दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन केले जाते. या योजनेचा प्लस पॉइंट असा आहे की, किमान गुंतवणूक रु 1,000 असली तरी कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही.

मात्र, कर लाभाची रक्कम दीड लाख रुपये आहे. 5 वर्षांच्या मुदत ठेवी अंतर्गत केलेली गुंतवणूक कलम 80C कर लाभांसाठी पात्र आहे. 5 वर्षांच्या मुदत ठेवीसाठी सध्याचा व्याजदर 7 टक्के आहे.

post office
Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना फक्त तुमच्याचसाठी, मिळणार शानदार रिटर्न

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

तुम्ही NSC योजनेत किमान रु 1,000 आणि त्यानंतर रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करु शकता. कोणतीही उच्च मर्यादा नाही. NSC योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षांचा आहे आणि सध्याचा व्याजदर 7 टक्के आहे. किमान वयोमर्यादा 10 वर्षे असून आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viral Post
Victim Compensation Scheme
Goa Ujjwala Scheme Latest Update
Goa Women Digital Empowerment Scheme
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com