PM Kisan Scheme: Government to deposit Rs 2000 to beneficiaries from Monday Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: सरकार उद्या तुमच्या खात्यात पाठवणार 2000 रुपये

उद्या 9 ऑगस्टला पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा नववा हप्ता हस्तांतरित करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) उद्या 9 ऑगस्टला पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा नववा हप्ता हस्तांतरित करणार आहेत. पीएम मोदी स्वतः ही रक्कम सोमवारी दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधतील.(PM Kisan Scheme: Government to deposit Rs 2000 to beneficiaries from Monday)

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या लाभार्थ्यांची यादी तपासावी लागेल. याचे कारण असे आहे की अलीकडेच विविध राज्य सरकारांनी अशा लाभार्थींची ओळख पटवली आहे, जे अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत होते.वास्तविक पाहता पीएम किसानच्या अटींनुसार, काही लोक शेती करत असूनही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, खासदार, आमदार आणि सरकारी कर्मचारी किंवा ग्रुप डी व्यतिरिक्त इतर अधिकारी, 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन प्राप्त करणारे पेन्शनर्स (ग्रुप डी वगळता) यांचा समावेश आहे. ज्यांची नावे या यादीतून काढून टाकली गेली आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

जर तुम्हला तुमचे नाव या यादीत तपासायचे असल्यास https://pmkisan.gov.in/ या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही ते चेक करू शकता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये पाठवते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते.या योजनेनुसार एकूण 12 कोटी 11 लाख शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT