Pegasus spyware: भारतीय वृत्तपत्रं भ्याड; चिंदबरम आक्रमक

Pegasus: माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनी पेगॅसेस एकापाठोपाठ एक असे एकूण तीन ट्वीट केले आहेत.
P Chidambaram has called Indian newspapers timid
P Chidambaram has called Indian newspapers timid Dainik Gomantak

कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम (P. Chidambaram) यांनी पेगॅसेस (Pegasus) हेरगिरी प्रकरणावर आक्रमक भुमिका घेत आपले मत व्यक्त केले आहेत. यावेळी बोलताना पेगासेस प्रकरणात शेवटची आशा म्हणजे सर्वोच्च न्यायालयच आहे, कारण भारतीय वृत्तपत्रांनी (Indian Newspapers) आता या प्रकरणाशी संबंधित बातम्या त्यांच्या पानांवरून काढून टाकल्या असल्याचे सांगितले. तसेच पुढे त्यांनी भारतीय वृत्तपत्रांनी घेतलेल्या भुमिकेबद्दल ‘भारतीय वृत्तपत्र भ्याड आहेत’ असे विधान केले आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनी पेगासेस एकापाठोपाठ एक असे एकूण तीन ट्वीट केले आहेत. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रिटिश नियतकालिक 'द इकॉनॉमिस्ट' वृत्तपत्राचा संदर्भ देत "द इकॉनॉमिस्ट मॅगझिनने अहवाल दिला आहे की, भारत अशा दहा देशांमध्ये आहे ज्यांच्याकडे एकूण 50,000 दूरध्वनी क्रमांकाची संभाव्य यादी आहे, त्यापैकी शेकडो क्रमांकांवर पाळत ठेवली गेली आहे. पेगासेस सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या एनएसओ ग्रुपने देखील मान्य केले आहे की त्याच्याकडे 40 देश आणि 60 एजन्सी आहेत."असे मत मांडले आहे. तसेच ‘त्यापैकी दहा जणांनी हेरगिरीसाठी पेगॅसेस स्पायवेअरचा वापर केला. भारत सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे का? हा प्रश्न आहे.

दरम्यान, या प्रकरणात राहुल गांधींसह अनेक विरोधीपक्षातील नेते, पत्रकार, न्यायाधीशांसह अनेक लोकांच्या कथित हेरगिरीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. गेल्या गुरुवारी या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com