RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

12500 भरा अन् RBI कडून मिळवा 4.62 कोटी, PIB ने सांगितली सत्यता

PIB Fact Check News: 12500 रुपये भरा आणि त्या बदल्यात तुमच्या खात्यात 4 कोटी 62 लाख रुपये येतील असा दावा केला जात आहे.

Manish Jadhav

Reserve Bank of India: भारतीय रिझर्व्ह बँक तुम्हाला 4.62 कोटी रुपये देत आहे? तुम्हालाही असा काही मेल आला आहे का, ज्यामध्ये 12500 रुपये भरा आणि त्या बदल्यात तुमच्या खात्यात 4 कोटी 62 लाख रुपये येतील असा दावा केला जात आहे. तुमच्या मेलमध्ये असा काही मेल आला असेल तर त्याआधी जाणून घ्या काय आहे संपूर्ण सत्य-

पीआयबीने वस्तुस्थिती तपासली

दरम्यान, हा मेल पाहिल्यानंतर पीआयबीने त्यात तथ्य तपासले. त्यांच्या फॅक्ट चेकद्वारे हा मेल खरा आहे की खोटा हे तपासण्यात आले आहे.

मेल बनावट आहे

दरम्यान, या मेलची सत्यता तपासल्यानंतर पीआयबीने हा मेल पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला असा काही मेल आला असेल तर तो डिलीट करा. यासोबतच असे मेल इतर कोणाशीही शेअर करु नका. आजकाल सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हायरल मेसेज दिसत आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती विचारली जाते.

आरबीआय कोणाचीही वैयक्तिक माहिती विचारत नाही

दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेकडून कोणाचीही वैयक्तिक माहिती मागितली जात नाही. यासोबतच ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती कोणाशीही आणि सोशल मीडियावर शेअर करायची नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

12500 भरावे लागतील

पीआयबीने ट्विटमध्ये सांगितले की, मेलमध्ये लिहिले आहे की आरबीआयला 12500 रुपये भरा आणि तुमच्या खात्यात 4 कोटी 62 लाख रुपये येतील.

आरबीआयमध्ये सामान्य व्यक्तीचे खाते नसते

आरबीआय (RBI) कोणत्याही व्यक्तीचे कोणतेही खाते ठेवत नाही. याशिवाय तुम्हाला आरबीआयकडून लॉटरी जिंकणे किंवा परदेशातून पैसे मिळणे असा कोणताही मेसेज आला, तर त्याच्या भानगडीत पडू नका. याशिवाय, लॉटरी फंड इत्यादींच्या बक्षीसाची माहिती देणारा कोणताही ईमेल आरबीआय पाठवत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aaroshi Govekar: .. ऐसी धाकड है! गोव्याच्या 'आरोशी'ची भारतीय फुटबॉल संघात निवड; नेपाळविरुद्ध पदार्पणाची संधी

Dawood Associate Arrested In Goa: मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या माणसाला गोव्यात अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Marathi Official Language: 'शाळेतून मराठीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न'! वेलिंगकरांचा आरोप; 2027 च्या निवडणुकीत पडसाद दिसतील असा इशारा

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपसा रोखण्‍यासाठी गोव्यात दिशानिर्देशांचे पालन होतेय का?

SCROLL FOR NEXT