Cooperative Banks License: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर सातत्याने कठोर पावले उचलली जात आहेत.
यापूर्वी एचडीएफसी आणि एचएसबीसी बँकेवर दंड ठोठावल्यानंतर आता आरबीआयने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कार्यरत असलेल्या दोन सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत.
तसेच, दोन्ही बँकांना 5 जुलै 2023 रोजी परवाना रद्द केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बँकिंग व्यवहार न करण्यास सांगितले आहे.
बुलढाणास्थित मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि बंगळुरुस्थित सुश्रुती सौहर्दा सहकार बँक नियमित (Shushruti Souharda Sahakara Bank Niyamita) यांचे बँकिंग परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली.
निवेदनानुसार, व्यवहार बंद झाल्यानंतर दोन्ही बँका कोणत्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारु शकणार नाहीत किंवा ग्राहकांना ठेवीही देऊ शकणार नाहीत.
दोन्ही सहकारी बँकांकडे (Cooperative Banks) पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्यामुळे मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक, महाराष्ट्र यांना बॅंक बंद करण्यास आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्यास सांगितले आहे.
रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे की, प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवीवरील ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असेल.
तसेच, बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 97.60% ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे.
मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यास त्याचा सार्वजनिक हितावर परिणाम होईल, असे आरबीआयने (RBI) म्हटले आहे. आगामी काळात, बँक आपल्या ठेवीदारांना सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार पूर्ण पेमेंट करु शकणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.