Mukesh Ambani and Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

नंबर 'वन'साठी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात पुन्हा एकदा रेस, अदानींच्या संपत्तीत झपाट्याने वाढ

Ashutosh Masgaunde

Mukesh Ambani and Gautam Adani race once again for number one, Adani's wealth grows rapidly:

अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे, ज्यामुळे ते पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या जवळ आले आहेत.

अशा स्थितीत गौतम अदानी पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींना मागे टाकणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात मुकेश अंबानी हे $92.4 अब्ज संपत्तीसह जगातील 13 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी अंबानींच्या संपत्तीत सुमारे 5.24 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. गौतम अदानी हे 88 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 14 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली होती, मात्र अमेरिकेकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर समभागांमध्ये रिकव्हरी झाली आहे.

मात्र, या वर्षी त्यांची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 अब्ज डॉलरने कमी आहे. यानुसार गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सुमारे ४.४ अब्ज डॉलरचा फरक आहे.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे मार्केटमध्ये अदानींबद्दल सकारात्मक बातम्यांचे आगमन.

या महिन्याच्या सुरुवातीलाच हिंडेनबर्गवरील अहवालाला अमेरिकन सरकारने अदानी समूहाला क्लीन चिट दिली होती. तेव्हापासून अदानी समूहात प्रचंड वाढ होताना दिसत आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क हे $225 अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

या यादीत दुसऱ्या स्थानावर Amazon चे संस्थापक जेफ बोजेस $171 अब्ज आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फ्रेंच लक्झरी वस्तू उत्पादन कंपनी LMVH चे मालक बर्नार्ड ऑर्नॉल्ट आहेत. त्याच्याकडे 170 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर आहेत, त्यांच्याकडे सुमारे 134 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. स्टीव्ह बाल्मर पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे सुमारे 128 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT