World Richest Person: श्रीमंतांच्या यादीत नंबर 2 कोण पटकवणार, जेफ बेझोस की बर्नार्ड अर्नॉल्ट?

Jeff Bezos vs Bernard Aernault: या यादीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या श्रीमंत लोकांकडे इतका पैसा आहे की, जगातील अनेक देशांचा जीडीपी त्यांच्या संपत्तीसमोर फिका पडतो.
Bernard Aernault vs Jeff Bezos
Bernard Aernault vs Jeff Bezos Dainik Gomantak
Published on
Updated on

Jeff Bezos Networth: ब्लूमबर्गने नुकतीच जगातील 10 श्रीमंतांची यादी जाहीर केली. या यादीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या श्रीमंत लोकांकडे इतका पैसा आहे की, जगातील अनेक देशांचा जीडीपी त्यांच्या संपत्तीसमोर फिका पडतो.

या यादीत टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) पहिल्या क्रमांकावर आहेत. मोएट हेनेसी लुईचे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस तिसऱ्या स्थानावर आहेत.

श्रीमंतांच्या या यादीत, यावेळी लढत पहिल्या क्रमांकासाठी नसून दुसऱ्या क्रमांकासाठी आहे, बर्नार्ड अर्नॉल्ट आपले नंबर 2 स्थान टिकवून ठेवू शकतील की जेफ बेझोस हे नंबर 2 वर येतील हे पाहावं लागणार आहे.

तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस

ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्यातील अंतर खूपच कमी आहे. नंबर 2 वर असलेल्या दोघांमधील फरक फक्त 1 अब्ज डॉलरचा आहे. असे सांगितले जात आहे की, जेफ बेझोस लवकरात लवकर अर्नॉल्ट यांना मागे टाकतील.

अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती 886 दशलक्षने घटून 170 अब्ज डॉलर झाली आहे, तर जेफ बेझोस यांची संपत्ती 3.51 अब्जांनी वाढली आहे. याचा अर्थ दोघांमधील अंतर खूपच कमी आहे.

आता अर्नॉल्ट आणि जेफ बेझोस एलन मस्कशी स्पर्धा करु शकतील का, तर याचे उत्तर 'नाही' असेल. वास्तविक, मस्कची एकूण संपत्ती सध्या 245 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

Bernard Aernault vs Jeff Bezos
Elon Musk New Startup: एलन मस्क यांनी केली नव्या कंपनीची घोषणा, ChatGPT ला नवा पर्याय?

मस्क पहिल्या क्रमांकावर

जर तुम्ही बर्नार्ड अर्नॉल्ट आणि मस्क यांच्या संपत्तीतील फरक पाहिला तर तो $75 अब्ज एवढा आहे, तर जेफ बेझोस $ 76 बिलियनने मागे आहेत.

तज्ज्ञांच्या मते, हा आकडा गाठणं सोपं असणार नाही. दुसरीकडे, श्रीमंतांच्या यादीतील इतरांबद्दल बोलायचे झाल्यास, मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg), लॅरी पेज, सर्जे ब्रिन आणि बिल गेट्स आघाडीवर आहेत. श्रीमंतांच्या यादीतील इतर नावे मस्क, अर्नॉल्ट आणि जेफ बेझोस यांच्या मागे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com