LIC IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC च्या IPOला मार्च 2022 पासून सुरुवात

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा IPO मार्चच्या सुरुवातीलाच येणार आहे, असे संकेत सरकारने दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा IPO मार्चच्या सुरुवातीलाच येणार आहे, असे संकेत सरकारने दिले आहेत. DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडा यांनी सांगितले की, मार्चच्या सुरुवातीला LIC IPO आणण्याबद्दल आम्ही खूप आतूर आहोत. एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकार बाजारातून एक लाख कोटी रुपये उभे करू शकते, असा विश्वास आहे

IPO आणण्याची तयारी कुठे सुरू आहे? त्याच वेळी, LIC पॉलिसीधारकांना सल्ला देत आहे की देशाच्या IPO इतिहासातील सर्वात मोठा IPO आणण्यापूर्वी त्यांच्या पॉलिसीशी पॅन क्रमांक लिंक करा, जेणेकरून LIC च्या IPO मधील पॉलिसीधारक राखीव श्रेणीमध्ये अर्ज करण्यास पात्र असेल. एवढेच नाही तर एलआयसीने पॉलिसीधारकांना आयपीओसाठी अर्ज करण्यासाठी डीमॅट खाते उघडण्यास सांगितले आहे.

एलआयसीच्या आयपीओसाठी ( IPO) अर्ज करण्यासाठी, एखाद्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. LIC आपल्या पॉलिसीधारकांना जाहिराती आणि ईमेल पाठवून माहिती देते. अशा परिस्थितीत नवीन डिमॅट खाती उघडणाऱ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे.

LIC कडे एकूण 25 कोटी पॉलिसीधारक आहेत तर देशात डीमॅट खात्यांची संख्या 7.5 कोटीच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत, ज्या पॉलिसीधारकांना एलआयसीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत, अश्यांनी डीमॅट खाते उघडणे आवश्यक आहे. हे पाहता डिमॅट खाती उघडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. कोरोनाच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संख्येतही मोठी वाढ दिसून आली आहे. विक्रमी संख्येने नवीन डीमॅट ट्रेडिंग खाती देखील उघडण्यात आली आहेत. 2019-20 मध्ये डीमॅट ट्रेडिंग खात्यांची संख्या फक्त 4.09 कोटी होती, जी 2020-21 मध्ये 5.51 कोटी झाली आहे आणि ती 31 ऑक्टोबरपर्यंत 7.38 कोटींवर पोहोचली.

एलआयसीच्या (LIC) पॉलिसीधारकांसाठी एलआयसीच्या आयपीओमध्ये 10 टक्के राखीव कोटा ठेवण्याचा सरकारचा मोठा हेतू आहे. अशा परिस्थितीत, एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते उघडणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात नवीन डिमॅट खाते उघडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची अपेक्षा दर्शवली जात आहे. येत्या दीड महिन्यात 20 ते 30 लाख नवीन डिमॅट खाती उघडली जाण्याची शक्यता देखील आहे.

एलआयसी त्यांच्या पॉलिसीधारकांना पॉलिसीशी पॅन क्रमांक लिंक करण्यासाठी सतत ईमेल आणि एसएमएस पाठवत आहेत. ज्यामध्ये पॅन कसे अपडेट करायचे हे देखील सांगितले जात आहे. एलआयसी पॉलिसीधारक https://licindia.in किंवा https://licindia.in/Home/Online-PAN-Registration वर भेट देऊन पॅन नंबर पॉलिसीशी लिंक करू शकतात. लिंक करताना, पॉलिसीधारकाला त्याचा पॉलिसी क्रमांक, पॅन क्रमांक, जन्मतारीख, ईमेल आयडी अपडेट करावा लागणार आहे. पॉलिसीधारक त्यांचा पॅन पॉलिसीशी लिंक आहे की नाही हे देखील तपासू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT