देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाला विश्वास आहे की, चालू तिमाहीत इलेक्ट्रॉनिक घटकांच्या (चीप) पुरवठ्यात हळूहळू सुधारणा होऊन उत्पादनांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. मारुती सुझुकी भारतातील देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारपेठेतील 50 टक्के बाजारपेठेतील हिस्सा गाठण्यासाठी SUV पोर्टफोलिओ मजबूत करण्यासह इतर उपायांवर विचार करत आहे. कंपनीचे एकूण सुमारे 44 टक्के शेअर मार्केट मध्ये आहे. एसयूव्ही रेंजमध्ये कंपनीची स्थिती फारशी मजबूत नाही, पण मागणी वेगाने वाढत आहे.(Maruti Suzuki Production)
चिप नसल्यामुळे 90 हजार वाहनांची निर्मिती थांबली होती.
मारुती सुझुकी इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) अजय सेठ यांनी सांगितले की, “जागतिक स्तरावर, इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे, तिसऱ्या तिमाहीत सुमारे 90,000 वाहनांची निर्मिती होऊ शकली नाही. इलेक्ट्रॉनिक घटकांची स्थिती अद्याप अनिश्चित असली तरी पुरवठा मात्र हळूहळू आता सुधारत आहे. कंपनीला चौथ्या तिमाहीत उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु ती पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणार नाही. सध्या, हरियाणा आणि गुजरातमधील मारुतीच्या संयंत्रांची तिमाही उत्पादन क्षमता ही सुमारे 5.5 लाख युनिट्स किंवा वार्षिक 22 लाख युनिट्स आहे.
सणासुदीच्या काळात चिप चा तुटवडा निर्माण झाला होता
अजय सेठ, मारुती सुझुकी इंडियाचे सीएफओ म्हणाले की, विशेषत: सणासुदीच्या काळात, कारची(Car) मागणी सामान्यतः चांगली राहते. त्यामुळे कंपनीला ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये इलेक्ट्रॉनिक घटकांच्या तुटवड्याचा सामना करावा लागला होता. मात्र आता मागील तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत चौकशी, बुकिंग आणि किरकोळ विक्रीत सुधारणा झाली आहे. वित्त उपलब्धता आणि व्याजदर सुध्दा अनुकूल आहेत.
मारुती सुझुकी उद्दिष्टाच्या केवळ 40 टक्के उत्पादन करू शकली
उत्पादन परिस्थितीबद्दल, मारुतीचे विक्री आणि विपणन विभागाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले की, गेल्या वर्षी सप्टेंबरपासून परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यावेळी कंपनी आपल्या उत्पादन लक्ष्याच्या केवळ 40 टक्के उत्पादन करू शकली. या अर्थाने परिस्थिती सुधारत आहे. मात्र, ती अजूनही शंभर टक्के झालेली नाही. आम्ही सध्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चची वाट पाहतो. आम्ही 90 टक्क्यांच्या वर जाण्याची अपेक्षा करत आहोत. मात्र, आम्ही कदाचित 100 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.