ई-पासपोर्ट बदलेल तुमच्या प्रवासाचा अनुभव, जाणून घ्या फायदे

ई-पासपोर्टमधील अर्जदारांची माहिती चिपमध्ये सेव्ह केली जाईल, जी बदलता येणार नाही.
E-passport
E-passportDainik Gomantak
Published on
Updated on

या आठवड्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात ई-पासपोर्ट सादर करण्याची घोषणा झाल्याने देशभरातही उत्सुकता वाढली आहे. लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की ई-पासपोर्ट म्हणजे काय आणि लोकांना त्याचा काय फायदा होईल. ई-पासपोर्ट (E-Passport) सामान्यतः वापरल्या जाणार्‍या पासपोर्टचा एक इलेक्ट्रॉनिक प्रकार आहे ज्यामध्ये माहिती साठवण्यासाठी चिप वापरली जाते. जगभरात अनेक ठिकाणी ई-पासपोर्टचा वापर केला जात असून त्याच्या मदतीने प्रवाशांचा वेळ वाचतो आणि पासपोर्ट काढण्याचे कामही जलद गने आणि सुलभपणे होत असल्याचे दिसून आले आहे.

E-passport
Elon Musk ची टेस्ला कंपनीवर आले संकट !

बीबीसीच्या (BBC) रिपोर्टनुसार, ई-पासपोर्ट सामान्य पासपोर्टसारखा दिसेल, पण त्यात एक विशेष चिप वापरली जाणार आहे, जी पासपोर्टच्या आत बसवली जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, ई-पासपोर्टमधील अर्जदारांची माहिती चिपमध्ये सेव्ह केली जाईल, जी बदलता येणार नाही, विशेष बाब म्हणजे या चिपमध्ये छेडछाड झाल्यास ई-पासपोर्ट काम करणे बंद करणार. ई-पासपोर्ट आधार सारखेच काम करेल, असा विश्वास आहे. म्हणजेच ती बनवताना बायोमेट्रिक माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून विमानतळावर प्रवाशाला सहज ओळखले जाऊ शकते. मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, चिपमध्ये 30 ट्रिपची माहिती भरली जाऊ शकते.

ई-पासपोर्ट ही नवीन कल्पना नाही. सध्या, 100 हून अधिक देश ई-पासपोर्ट जारी करत आहेत आणि ते पासपोर्टचे वैशिष्ट्य म्हणून दिले जाते आहे. विशेष बाब म्हणजे 2008 मध्ये भारतात ई-पासपोर्ट जारी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता, त्यानंतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांसाठी 20 हजार ई-पासपोर्ट जारी करण्यात आले. सध्या जगभरात ई-पासपोर्ट अनिवार्य नाहीये. 2016 मध्ये सर्व देशांनी सर्व पासपोर्ट मशीन रीडेबल असावेत असा निर्णय घेतला होता. सध्या युरोपातील बहुतांश देशांमध्ये ई-पासपोर्ट वापरले जातात. जगातील 450 दशलक्षाहून अधिक लोकांकडे ई-पासपोर्ट आहेत. सध्या युरोपातील विमानतळांवरती स्वतंत्र ई-पासपोर्ट लाइन आहे. भारत सरकारने ई-पासपोर्टसाठी इंडिया सिक्युरिटी प्रेसला निविदा दिली आहे, खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ई-पासपोर्ट जारी केले जातील.

E-passport
2 मिनिटात करा आपला PF बॅलेंस चेक

ज्या देशांमध्ये ई-पासपोर्ट प्रचलित आहे. तेथे त्या व्यक्तीचा पासपोर्ट अधिकाऱ्याकडून नव्हे तर स्वयंचलित मशीनद्वारे तपासतात. पासपोर्टधारक जेव्हा इमिग्रेशन गेटवर जातो तेव्हा तेथे बसवलेले मशीन आणि कॅमेरा पासपोर्टवरील चिप स्कॅन करतो. सर्व माहिती चिपवर असते जी प्रणाली तपासते आणि गेट उघडते आणि प्रवासी त्याच्या प्रवासासाठी पुढे जाऊ जातो. ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आहे, त्यासाठी खूप कमी वेळ लागतो.

ई-पासपोर्टमुळे बराच वेळ वाचतो आणि लोकांना त्यांच्या प्रवासात पुढे जाण्यास वेळ लागत नाही कारण सर्व काम मशीनद्वारे केले जाते आहे. यासोबतच ई-पासपोर्टच्या मदतीने फसवणूक रोखण्यातही खूप मदत होते कारण त्यात बायोमेट्रिक माहितीचा वापर केला जातो. ज्यामुळे फसवणूक शक्य नाही. त्याचबरोबर नवीन पासपोर्ट वाटपाच्या कामालाही वेग आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com