Jio Coin Dainik Gomantak
अर्थविश्व

काय आहे JioCoin? मुकेश अंबानींची रिलायन्स आता क्रिप्टोच्या जगात ठेवणार पाऊल; यूजर्समध्ये उत्साह

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ प्लॅटफॉर्मने इंटरनेट टेक्नोलॉजी कंपनी पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारीची केली आहे.

Manish Jadhav

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ प्लॅटफॉर्मने इंटरनेट टेक्नोलॉजी कंपनी पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या घोषणेपासून, सोशल मीडिया यूजर्स “जिओकॉइन” बद्दल मोठ्या उत्साहाने बोलत आहेत. एवढचं नाहीतर ऑनलाइन स्क्रीनशॉट सुद्धा शेअर करत आहेत.

कंपनीने अधिकृतरित्या त्याची घोषणा केली नसली तरी अनेक यूजर्स X वर “JioCoin” चे फोटो शेअर करताना दिसत आहेत. बिटिंगचे संस्थापक काशिफ रझा यांनी असा अंदाज लावला की, जिओ मोबाईल रिचार्ज करण्यासाठी किंवा रिलायन्स स्टेशनवर पेट्रोल खरेदी करण्यासाठी “जिओकॉइन” वापरात आणू शकते.

दरम्यान, भारतातील (India) सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने पॉलीगॉन नेटवर्कवर "जिओकॉइन" नावाचे डिजिटल टोकन तात्पुरते लॉन्च केले आहे. कंपनीने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, यूजर्संना अँड्रॉइड आणि आयओएस डिवाइससाठी कंपनीच्या वेब ब्राउझर जिओस्फीअरवर जिओकॉइनचा उल्लेख आढळला.

रिलायन्सची टेक उपकंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सने भारतात वेब 3 आणि ब्लॉकचेन टेक्नोलॉजी आणण्यासाठी पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भागीदारीमुळे जिओ यूजर्संना नवीन आणि इनोवेटिव्ह सेवांसह त्यांच्या डेटावर गोपनीयता आणि नियंत्रण मिळू शकेल.

काय आहे जिओकॉईन? (Jio Coin)

CoinDCX च्या रिपोर्टनुसार, JioCoin हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा सर्वात नवीन आणि हटके प्रोजेक्ट असल्याचे मानले जाते आहे, जो भारतात ब्लॉकचेन टेक्नोलॉजी आणणार आहे. जिओच्या पाठिंब्याने, जिओकॉइनचे उद्दिष्ट डिजिटल व्यवहार सोपे आणि अधिक सुरक्षित करणे आहे. शिवाय, क्रिप्टोच्या जगात भारतातील सर्वात मोठ्या समूहाची एन्ट्री मानली जात आहे. जिओकॉइनची रचना जिओच्या डिजिटल सेवा जसे की पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग आणि डेटा स्टोरेजला मदत करण्यासाठी करण्यात आली आहे.

"CoinDCX" नुसार, भारत ब्लॉकचेन टेक्नोलॉजीचा अवलंब करत असल्याने, हे कॉईन अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. JioCoin लॉन्च केल्यास भारतातील अधिकाधिक लोकांना क्रिप्टोकरन्सी वापरण्यास प्रोत्साहित केले जाईल. ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवर आधारित, रिलायन्स (Reliance) कोट्यवधी लोकांना क्रिप्टो-मार्केटबद्दल शिक्षित करु शकते.

CoinDCX ने शेवटी म्हटले की, "यामुळे इतर भारतीय कंपन्यांना ब्लॉकचेनचा शोध घेण्यास प्रोत्साहित करता येईल, ज्यामुळे वित्त, आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रांमध्ये नावीन्य येईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT